नेवासा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सुचनेनंतर उमेदवारांच्या प्रचाराच्या गाड्यांची पोलिसांकडून तपासणी
संतोष औताडे -मुख्य संपादक, नेवासा दिनांक – 12/11/2024
*नेवासा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सुचने नंतर उमेदवारांच्या प्रचाराच्या गाड्यांची पोलिसांकडून तपासणी* सविस्तर माहिती – नेवासा तालुक्यातील उमेदवार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने मा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विधानसभा 221 नेवासा यांनी पाठवलेल्या पत्राच्या अनुषंगाने उमेदवारांच्या प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची नेवासा पोलिसांनी अचानक तपासणी केली आहे.
पथक 1. पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव पो. कॉ. अरविंद वैद्य प्रवरा संगम, 2. पो. उपनिरीक्षक ससाने पो. कॉ. गणेश जाधव मधमेश्वर चौक, 3. पो. उपनिरीक्षक अहिरे पो. कॉ. डमाळे नेवासा फाटा, 4. पो. उपनिरीक्षक पाटील पो. कॉ. राम वैद्य नेवासा शहर, 5. पो. हवा. केदार पो. कॉ. तांबे खुपटी रोड, 6. पो. हवा. राठोड, पो. कॉ. आप्पा वैद्य नेवासा बुद्रुक 7. पो. ना. संजय माने, पो. कॉ. गोवर्धन पवार अहिल्यानगर रोड. यांनी नेवासा तालुक्यातील विविध ठिकाणी निवडणूक काळातील सर्व प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांची तपासणी नेवासा पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली होती.