ब्रेकिंग
Trending

आरोपीने लुटमार केलेले सोने नेवासा पोलिसांनी फिर्यादीस केले परत”

संतोष औताडे- मुख्य संपादक,नेवासा                     दिनांक – 12/2/2025

सविस्तर हकीकत अशी की, दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी तुमच्या नावे बँकेत मोदीचे पैसे आले आहेत, ते मी तुम्हाला काढून देतो, मी बँकेचा माणूस आहे असे म्हणून त्याने वयस्कर फिर्यादी महिला नामे साखरबाई नामदेव कुटे रा. देडगाव ता. नेवासा यांना त्याचे मोटर सायकलवर बसवून देवगाव कारेगाव रोडवर शिवारात नेऊन जीवे ठार मारण्याची धमकी देऊन गळ्यातील तेरा ग्रॅम वजनाच्या दोन पोथी व कानातील सोन्याचे दागिने बळजबरीने काढून नेल्याबाबत पोलीस ठाणे नेवासा येथे फिर्याद दाखल केली होती. सदरच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अनोळखी आरोपी विरुद्ध जबरीची चोरी असा गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस ठाणे नेवासाकडील पोलीस उपनिरीक्षक भोंबे हे करीत असताना पोलीस उपनिरीक्षक ढाकणे, पोलीस नाईक काळोखे, पोलीस कॉन्स्टेबल फाटक यांनी देडगाव परिसरातील सीसीटीव्हीची छाननी करून आरोपी नामे युवराज प्रकाश गजरे रा. भेंडा ता. नेवासा हा निष्पन्न केला होता, आरोपी लपून छपून राहून काही दिवस पोलिसांना गुंगारा देत होता परंतु पोलिसांनी सदर गुन्ह्यात आरोपीस सिताफिने अटक केली होती. गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपीने जबरीने चोरलेले सोने कुकाणा स्थित सराफास विकले होते. आरोपीस सराफी दुकानात घेऊन जाताच विकत घेतलेले सोने काढून दिले होते. तपासा दरम्यान पोलिसांनी जप्त केलेले सोने परत मिळवण्यासाठी फिर्यादी महिला यांनी मा. नेवासा न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता. सदर अर्जानुसार गुन्ह्याच्या तपासात जप्त केलेले सोने परत करण्यास कोणतीही हरकत नसल्याबाबत पोलिसांनी न्यायालयास कळवले होते. त्यानुसार गुन्ह्यात जप्त केलेले सोने फिर्यादीस परत करण्याबाबतचा मा. न्यायालयाने आदेश दिला होता. त्यानुसार गुन्ह्यामध्ये जप्त केलेले तेरा ग्रॅम सोने आज रोजी पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांचे उपस्थितीत फिर्यादी यांना विधीवत परत करण्यात आले याबाबत फिर्यादीने समाधान व आनंद व्यक्त केले.

 

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे