लोकनेते मारूतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यास राज्य आपत्ती व्यवस्थापन दल NDRF ची भेट
Autade Santosh4 weeks ago
281
संतोष औताडे – मुख्य संपादक, नेवासा. दिनांक -08/02/2025
सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातीलभेंडा येथील लोकनेते मारूतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडा बु येथे दिनांक 08/02/2025 रोजी राज्य आपत्ती व्यवस्थापन दल NDRF 5 बटालीयन टीम पुणे तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण प्रशिक्षणार्थी (आपदा मिञ) अहिल्यानगर यांनी भेट दिली.
यावेळी कारखान्याचे सेफ्टी विभागाचे प्रमुख केतन देशमुख यांनी कारखाना परिसरात सेफ्टी विभाग तसेच इथेनॉल प्रकल्प निर्मिती,डिसलरी विभाग, साखर निर्मिती प्रक्रिया, बॉयलर मोलासेस, सहविज निर्मिती प्रकल्प विभाग, बॉयलर विभाग, साखर उत्पादन प्रक्रिया तसेच कारखाना परिसरातील सेफ्टी विभागाची सविस्तर माहिती दिली. त्यावेळी कार्यकारी संचालक अनिल शेवाळे साहेब यांनी सर्व NDRF टीम व आपदा मिञ यांचे स्वागत केले. यावेळी सचिव रवींद्र मोटे साहेब, कामगार संचालक सुखदेव फुलारी साहेब उपस्थित होते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (NDRF) 5 बटालियन ,पुणे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण DDMA अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक – 08/02/2025 रोजी सकाळी 11.00 वा नेवासा तहसील कार्यालय अंतर्गत श्री ज्ञानेश्वर कॉलेज, नेवासा (तांबे हॉल) येथेRegarding Familiarization Exercise Programme 2024 2025 and Table Top & MockExercise on Chemical spillage disaster..
(राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ( NDRF) यांचे पथका मार्फत जनजागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. NDRF टीम ने आपत्ती व्यवस्थापन विषयावर प्रशिक्षण व प्रात्यक्षिके सादर केली.यावेळी मा.प्रविण घट साहेब असिस्टंट कमांडर NDRF पुणे, संतोष कुमार तिवारी NDRF, योगेश कुमार शर्मा NDRF, नामदेव मोरे सर NDRF जवान, चांगदेव बोरूडे साहेब नायब तहसीलदार नेवासा, उफ्फड साहेब तहसील कार्यालय नेवासा,*संतोष औताडे- पञकार) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण प्रशिक्षणार्थी आपदा मिञ अहिल्यानगर*, हर्षदा शिंदे आपदा सखी, श्री ज्ञानेश्वर महविद्यालयाचे प्राचार्य कल्हापुरे सर, घनवट सर,तसेच महाविद्यालयातील कर्मचारी, शिक्षक वर्ग विद्यार्थी/ विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे स्वागत डॉ अरूण घनवट सर उपप्राचार्य यांनी केले. तर प्रस्ताविक संतोष औताडे (आपदा मिञ) यांनी केले.