Oplus_0
संतोष औताडे -मुख्य संपादक ,नेवासा. दिनांक-30/12/2024
उधोजक सिध्दांत नवले पाटील यांच्या संवाद मेळाव्याला तरुणांचा उस्फुर्त प्रतिसाद. सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील भेंडा खु येथील युवा उद्योजक सिद्धांत नवले पाटील यांच्या संवाद मेळाव्याला तरुणांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
राजकीय पार्श्वभूमी असलेल्या नवले परिवारातील सिद्धांत नवले पाटील हे एक उच्च पदस्त कृषी पदवीधर (BSC Aagri ) झालेले असुन त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग फक्त स्वःताच्या हितासाठी नाही तर समाजातील सर्व घटकांना फायदा कसा होणार या साठी केला. त्यासाठी त्यांनी सिध्दांत सिड्स नावाची कंपनी ची स्थापना भेंडा सारख्या येथील ग्रामीण भागात केली . अनेक गोरगरीब जनतेला व मुलांना यामुळे रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. सिद्धांत नवले पाटील यांनी सांगितले की दुसरी कडे नोकरी करू शिकलो असतो पण माझी नाळ ग्रामीण भागाशी जोडलेली असल्यामुळे मी इथेच राहण्याचा निर्णय घेतला.येथे राहुन समाजासाठी काही तरी करण्याची इच्छा आहे. परंतु या साठी मला तुमच्या सर्वाची साथ हवी आहे
म्हणून मी येणाऱ्या आगामी निवडणुकीत पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. असे सांगितले या संवाद मेळाव्याला आलेल्या उपस्थित तरुणांचा उस्फुर्त प्रतिसाद हीच माझी ताकद असल्याचे उधोजक सिध्दांत नवले पाटील यांनी सांगितले . नवले पाटील कुटुंबातील राजकीय पार्श्वभूमी ही त्यांच्या साठी नवीन नाही परंतू स्वतःहून पुढाकार घेऊन आपण समाजा साठी राजकीय शेञात येणार असल्याचे संकेत या संवाद मेळाव्यातुन करण्यात आला. यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी सिद्धांत नवले पाटील यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या तसचे येणाऱ्या काळात सर्व जण तरुण तुमच्या पाठीशी असल्याची खात्री करून दिली. नवले सर, नामदेव शिंदे, सुनील गव्हाणे, रविंद्र नवले, किशोर मिसाळ, पंढरीनाथ फुलारी, राजेंद्र शिंदे,दादा गजरे यांची भाषणे झाली.
आज झालेल्या या संवाद मेळाव्यातुन एक शांत संयमी व समाजासाठी झटणारे नेतृत्व मिळणार असल्याचे चित्र दिसून आले . येणाऱ्या काळात काही अडचण आली तर मला सांगा ती सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे उधोजक सिध्दांत नवले पाटील यांनी सांगितले या संवाद मेळाव्या प्रसंगी गणेश महाराज चौधरी यांनी सुञ संचालन केले तर सिध्दांत नवले पाटील यांनी आभार मानुन येणाऱ्या काळात माझ्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.