राजकिय
Trending

महायुतीकडूनच भेंडा गटाची निवडणूक लढणार – युवा नेते सिद्धांत नवले

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा                   दिनांक – 10/11/2025


सविस्तर माहिती-  महायुतीकडूनच भेंडा गटाची निवडणूक लढणार – युवा नेते सिद्धांत नवले यांनी सांगितले आहे.सध्या होऊ घातलेल्या भेंडा गट जिल्हा परिषद निवडणूक आपण महायुतीकडूनच लढणार असल्याचा निर्धार युवा नेते व आमदार विठ्ठलराव लंघे यांचे जावई सिद्धांत नवले यांनी केला आहे शनिवारी भेंडा येथील नवले वस्तीवर पार पडलेल्या भेंडा गटातील कार्यकर्त्यांच्या विचार विनिमय बैठकीत ते बोलत होते.
यावेळी ह भ प रामभाऊ महाराज पेहेरे, हरिभाऊ नवले,दत्तात्रेय नवले, नवले सर, बबनराव शिंदे, शिवाजीराव शेजुळ, सरपंच दादा गजरे,व्यासपीठावर उपस्थित होते
सिद्धांत नवले आपल्या भाषणात पुढे म्हणाले की आपण गेल्या तीन चार वर्षापासून भेंडा जिल्हा परिषद गटात निवडणुकीची तयारी करत आहोत भेंडा गटात येणाऱ्या अठरा गावात मी पोहोचलेलो आहे प्रत्येक लग्नकार्य सुखदुःखाची घटना व इतर सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन जनतेच्या समस्या समजून घेत आहे आणि हे करत असताना तरुणांची मोठी फळी आपल्या सोबत तयार झाली तरुण आणि ज्येष्ठ यांच्या मार्गदर्शनातूनच आपण हा निर्णय घेत आहोत अनेक दिवस मी जनतेमध्ये जात असताना प्रत्येकाला शब्द दिला होता की निवडणूक लढवण्याच्या वेळी सर्वांना विचारात घेऊनच आपण पक्षप्रवेश करणार असल्याचा शब्द आज पूर्ण होत आहे.

आजही बैठकीत प्रत्येक व्यक्तीने आपण महायुतीकडूनच उमेदवारी करावी असा आग्रह धरलेला आहे त्यामुळे सर्वांच्या इच्छा खातर आपण महायुती कडूनच लढू असे ते म्हणाले माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात करत असताना माझे आजोबा आदरणीय काशिनाथ नवले पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच इथून पुढील काळात त्यांचे विचार,शिकवण, आणि कार्यावर चालणार आहोत असे देखील त्यांनी उपस्थिताना सांगितले तीन वर्षापासून आपण गावागावात फिरत असताना आरक्षण किंवा कोणत्या पक्षाकडून लढायचे याचा आपण विचार केला नव्हता फक्त आपल्याला भेंडागट एक रोल मॉडेल बनवून तालुक्यासमोर उभा करायचा आहे जनतेच्या समस्या सोडवायच्या भेंडा गटातील सर्वांगीण विकास करून रस्ते, वीज,पाणी, शिक्षण , आरोग्य या विषयाकडे आपण विशेष लक्ष देणार आहोत भेंडा जिल्हा परिषद गटाचा विकास करायचा असेल तर महायुती शिवाय पर्याय नाही कारण तालुक्यात,राज्यात व केंद्रात महायुतीचे सरकार आहे त्यामुळे आपल्याला काम करण्यास अडचणी येणार नाही त्याकरिता सर्व ज्येष्ठ मंडळींनी तरुणांनी आपल्याला साथ देऊन मार्गदर्शन करून आशीर्वाद द्यावे असे आवाहन त्यांनी केले

यावेळी भेंडा येथील विशाल शिंदे, सरपंच दादा गजरे, सुनील गव्हाणे,राजू चिधे,मक्तापूर येथील निवृत्ती लहारे,साळवे, गोंडेगाव येथील अशोक पाठक, रांजणगावचे पोलीस पाटील बबन शिंदे,ह भ प रामभाऊ महाराज पेहेरे, किशोर भांगे,ईश्वर काळे,शिवाजीराव शेजुळ,अजय कोळेकर,तुषार शिंदे, बाभुळखेडा येथील कडू सर,ज्येष्ठ मार्गदर्शक हरिभाऊ नवले, आदींची भाषणे झाली या सर्वांनी आपण महायुतीकडूनच कडूनच उमेदवारी करा आम्ही सर्वजण खंबीरपणे तुमच्या पाठीशी राहून तुम्हाला साथ देऊ अशी साद घातली या विचार विनिमय बैठकी प्रसंगी अठरा गावातील सुमारे तीनशे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक पत्रकार आदेश जावळे यांनी केले तर रवी नवले यांनी सर्वांचे आभार मानले

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे