संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा. दिनांक- 03/01/2025
⭕*”जबरी चोरटा सिताफिने जेरबंद”⭕*”जबरी चोरी करणारा पोलिसांच्या सापळ्यात”*
सविस्तर माहिती- दिनांक ०६/११/२०२४ रोजी रात्री १०/१५ वाजता कराड अमृततुल्यजवळ, अहिल्यानगर ते छ.संभाजीनगर जाणारे रोडवर, उस्थळ दुमला शिवार ता. नेवासा येथे फिर्यादी नामे अरुण बापुसाहेब वाघ रा. नारायणवाडी ता. नेवासा यांचे मोटार सायकलला दोन अनोळखी इसमांनी मोटार सायकल आडवी लावुन त्यांना धमकावुन एकाने त्यांचे हात धरुन दुस-याने त्यांचे, खिशात असलेला विवो कंपनीचा मोबाईल व ५०० रुपये बळजबरीने काढुन घेवुन छ. संभाजीनगरकडे पळुन गेलेबाबत नेवासा पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपासात पोलीस निरीक्षक श्री. धनंजय जाधव यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे अचुक तांत्रीक विश्लेषणाचे आधारे नमुद गुन्हा हा गणेश अण्णासाहेब बनसोडे व विधी संघर्षीत बालक नामे निलेश सुनिल मावस दोघे रा. भिवधानोरा ता. गंगापुर जिल्हा संभाजीनगर यांनी केल्याचे निष्पन्न झाले होते.
नमुद गुन्ह्यातील आरोपी गणेश अण्णासाहेब बनसोडे याचा भिवधानोरा ता. गंगापुर याची माहीती घेतली असता तो छ.संभाजीनगर व अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्यातुन एक वर्षाकरीता हद्दपार केले असलेबाबत माहीती मिळाली. त्यानंतर दिनांक २५/१२/२०२४ रोजी सायंकाळी गणेश बनसोडे हा राहते घरी आला असलेबाबत पो. नि. धनंजय जाधव यांना गोपनीय बातमीदाराने माहीती दिल्याने त्यास ताब्यात घेवुन अटक करणेकरीता पोसई मनोज अहीरे, पोहेकॉ शहाजी आंधळे व पोकॉ वासुदेव डमाळे असे पथकासह आरोपी गणेश बनसोडे याचे घरासमोर गेले असता पोलीसांना पाहुन गणेश बनसोडे हा घराचे पाठीमागील शेतात जोरात पळुन जाऊ लागला. पथकातील अधीकारी व कर्मचारी यांनी त्याचा सुमारे २ कि. मी. पळत सिताफीने पाठलाग केला असता आरोपी हा शेतातील उंच वाढलेल्या गिन्नी गवतात लपुन बसला. तपास पथकाने त्याचा गिन्नी गवतात बारकाईने शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन गंगापुर पोलीस स्टेशनला आणले. तेथे त्याचेवर हद्दपार कालावधीमध्ये परवांगीशिवाय छ.संभाजीनगर जिल्ह्याचे हद्दीत प्रवेश केला म्हणुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपीस अटक केल्यानंतर त्याचा आधी एम. सी. आर. घेवुन मा. तालुका दंडाधीकारी, नेवासा यांचे समक्ष ओळख परेड घेतली असता फिर्यादी अरुन वाघ यांनी त्यास दोन वेळेस तात्काळ अचुक ओळखले आहे. आरोपीकडे पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असताना त्याचेकडे कौशल्याने विचारपुस करुन नमुद गुन्ह्यात चोरी गेलेला मोबाईल हा जप्त केला आहे. दिनांक ०३/०१/२०२५ रोजी अटक आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड संपत असल्याने त्यास मा. न्यायालयात हजर करुन पुढील तपास चालु आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कल्लुबर्मे, मा.उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. सुनिल पाटील यांचे मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचे सुचणेप्रमाणे पोसई मनोज अहीरे, पोहेकॉ शहाजी आंधळे, पोहेकॉ/संतोष राठोड व पोकॉ/वासुदेव डमाळे व उत्तर मोबाईल सेलचे पोना/सचिन धनाड यांनी धडाडीने कारवाई केली आहे.