गुन्हेगारी
Trending

8,00,000/- रुपये किं 4,000 किलो वजनाचा मांगुर जातीचा मासा व 25,00,000/- रुपये किंमतीचा एक आयशर टेम्पो असा एकुण 33,00,000/-( रुपये किं मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.

संतोष औताडे (मुख्य संपादक -नेवासा) क्रमांक पीआरओ/प्रेसनोट/28/2023  दिनांक :- 01/02/2023
——————————————–
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे, सफौ/मनोहर शेजवळ, पोहेकॉ/संदीप पवार, मनोहर गोसावी, संदीप घोडके, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप चव्हाण, संदीप दरदंले, पोकॉ/कमलेश पाथरुट व चापोना/भरत बुधवंत अशांना बोलावुन घेवुन फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या व पथक तात्काळ रवाना केले.
स्थानिक गुन्हे शाखेतील पथक फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेत असताना पोनि/श्री. अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, अहमदनगर कडुन औरंगाबादच्या दिशेने एक पांढरे रंगाचा आयशर कंपनीचा काळे रंगाची ताडपत्री बांधलेला टेम्पोत बंदी असलेला मांगुर जातीचा मासा विक्री करीता घेवुन जात आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. अनिल कटके यांनी सदर माहिती पथकास कळवुन मस्यविकास अधिकारी तसेच नेवासा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना मदतीस घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.
नमुद आदेशान्वये पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अहमदनगर येथील मत्सविकास अधिकारी, अहमदनगर, स्थानिक पोलीस स्टेशन व पंचांचे मदतीने नगर औरंगाबाद रोडने जावुन माळी चिंचोरा फाटा, ता. नेवासा येथे सापळा लावुन थांबलेले असतांना बातमीतील नमुद पांढरे रंगाचा आयशर टेम्पो येताना दिसला पथकाची खात्री होताच टेम्पो चालकास हात दाखवुन थांबण्याचा इशारा करताच त्याने ताब्यातील आयशर टेम्पो रस्त्याचे कडेला उभा केला. त्यावेळी टेम्पोमध्ये दोन इसम बसलेले दिसले. त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) बप्पा ताजरुल विश्वास, वय 32 व 2) तोकामल मियाराज विश्वास, वय 48 दोन्ही रा. स्वरुप नगर, जिल्हा 24 परगाना, राज्य पश्चिम बंगाल असे असल्याचे सांगितले. त्यांना टेम्पोमध्ये काय आहे अशी विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीस समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यांना अधिक विश्वासात घेवुन बारकाईने विचारपुस करता त्यांनी टेम्पोमध्ये मांगुर जातीचा जिवंत मासा असुन तो मध्यप्रदेश राज्यात घेवुन जात असले बाबत माहिती दिल्याने दोन्ही संशयीतांना ताब्यात घेतले.
मा. मत्सविकास अधिकारी, अहमदनगर यांनी टेम्पोमधील माश्यांची पाहणी करुन सदर मासा हा मांगुर जातीचा असुन नमुद मांगुर जातीचे माश्यापासुन भारतीय माशांचे प्रजातीला व पर्यावरणाला धोका असुन मत्सपालन, विक्री व वाहतुकीस बंदी आहे असा अभिप्राय दिला व एक मांगुर जातीचा मासा पुढील तपासणी करीता सॅम्पल म्हणुन काढुन घेतल्याने दोन्ही इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन 8,00,000/- रुपये किंमतीचा 4,000 किलो वजनाचा मांगुर जातीचा मासा व 25,00,000/- रुपये किंमतीचा आयशर कंपनीचा टेम्पो असा एकुण 33,00,000/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन दोन्ही आरोपी विरुध्द नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. 119/2023 भादविक 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कायदेशीर कारवाई नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरमापूर, श्री. संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, श्रीरामपूर विभाग अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

 

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे