संतोष औताडे-मुख्य संपादक नेवासा, दिनांक- 27/08/2026
भेंडा येथील गोरे परिवाराने आईच्या प्रथम पुण्यस्मरण निमीत्त केले 400 वृक्ष वाटप.

आईचे प्रेम जसे आयुष्यभर सावली देते, तसेच ही झाडेही येणाऱ्या पिढ्यांना सावली आणि ऑक्सिजन देतील, याच भावनेतून हा छोटासा प्रयत्न केला आहे.”असेही गोरे कुटुंबाने सांगितले . सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील भेंडा येथील गोरे कुटुंबाने एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आपल्या आईच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने आलेल्या पाहुण्यांना वृक्ष वाटप करून स्तृत्य उपक्रम केला आहे . कै.गं भा. लता संतराम गोरे यांचे प्रथम पुण्यस्मरण आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी भेंडा येथील श्रीकृष्ण लॉन्स येथे आयोजित केला होता. या वेळी ह भ प ज्ञानेश्वर महाराज तांबे यांचे सकाळी 9ते 11 या वेळेत किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आलेल्या सर्व नागरिकांना फळांचे , फुलांच्या झाडांचे वाटप करून पर्यावरण संवर्धन करणे हिच आमच्या आईला खरी श्रद्धांजली ठरेल असे गोरे कुटुंबाने सांगीतले. रोपट्यांची निवड करतांना घरगुती आणि सार्वजनिक ठिकाणी लावता येतील अशी औषधी, फळझाडे किंवा सावली देणारी रोपे निवडली (गुलाब, आंबा, पेरू, नारळाचे झाड, जांभूळ, विविध फुलांची झाडे.तसेच शोभेच्या झाडांचा समावेश होता तसेच प्रत्येक रोपावर सुविचार व आईच्या आठवणी करून देणारी वाक्ये .लिहिलेले होती. गोरे कुटुंबाने आपली सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनाचा संदेश या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त दिला. केवळ औपचारिकता म्हणून नाही तर निसर्गाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला आहे. परिसरातील नागरिकांनी आणि नातेवाईक यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. आपल्या मातृप्रेमाचा आणि निसर्गऋणाचा अनोखा मेळ साधणारा हा अतिशय स्तुत्य आणि कौतुकास्पद उपक्रम गोरे कुटुंबाने केलाय आहे. आईच्या प्रथम पुण्यस्मरण निमीत्त गोरे परिवाराने समाजाला दिलेली ही ‘हिरवी भेट’ खरोखरच प्रेरणादायी आहे.एक झाड आईच्या नावाने ही संकल्पना केवळ वृक्षवाटपा पुरती मर्यादित नसून, ती आपल्या जीवनात आईच्या स्थानाची आठवण करून देणारे एक जिवंत प्रतीक ठरणार आहे. या वेळी श्री.अमोलकुमार संतराम गोरे, श्री.अनिलकुमार संतराम गोरे, श्री. परसराम त्रींबक गोरे,श्री. जालिंदर त्रींबक गोरे,श्री दत्तात्रय त्रींबक गोरे, सौ अपर्णा गणेश पुंड यांनी हा उपक्रम राबवला याबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.


