विठ्ठल भक्तीत रंगली खाकी कर्तव्याचे पालन करणारा खाकी वर्दीतील वारकरी
संतोष औताडे – मुख्य संपादक,नेवासा दिनांक -25/07/2026. विठ्ठल भक्तीत रंगली खाकी कर्तव्याचे पालन करणारा खाकी वर्दीतील वारकरी. सविस्तर माहिती- सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद वाक्य आपल्या मनाशी ठाम ठेवून सर्व सामान्य जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलेली खाकी वर्दी म्हणजे महाराष्ट्र पोलीस या खाकी वर्दीतला वारकरी अनेकांना पहायला मिळाला. 
आषाढी पालखी दिंडी सोहळा टाळ मृदुंगाच्या गजरात व ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करत पंढरपूरकडे निघालेल्या दिंडी सोहळ्या वेळी माऊली माऊलीच्या गजराने सर्व परिसर भक्तीमय झाला होता.रांगोळी , फटाक्यांची आतिषबाजी माऊलींच्या नामाचा गजर या दिंडीच्या स्वागतासाठी शहरातील प्रत्येक चौकामध्ये विविध संस्था संघटनाच्या वतीने वारकरी टाळकरी यांचे स्वागत कक्ष उभारण्यात आले .

पालखी सोहळ्यात दिंडीत पोलिसही मागे नव्हेत. त्यांच्या हातात आज काठी नव्हती. तर तो होता भक्तीमय नमस्कार . येणाऱ्यांशी आदराने ते बोलत होते. वाटेत जरा जरी वेगळ काही दिसल की त्याची व्यवस्था करण्याच्या सुचना देत होते. कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काम करत होते.पोलिस नसून वर्दीतील वारकरीच असल्याचे जाणवत होते. एक पोलिस नाही तर ते खाकी वर्दीतील वारकरी म्हणून वावरत होते.वारीत किंवा दिंडीत पोलिसांचे काम केवळ वाहतूक सुरळीत ठेवणे किंवा सुरक्षा देणे एवढ्यावर मर्यादित नसते. भाविकांची सुरक्षितता, आरोग्य आणि गरज पडल्यास त्यांच्या मदतीला धावून जाणे, हेही तेवढेच महत्त्वाचे असते. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नेवासा येथील पालखी सोहळ्यात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या कृतीतून याच संवेदनशील पोलिसिंग चे दर्शन पालखी सोहळ्यात घडले. उन वारा पाऊस या सारख्या परिस्थितीत आपल्या कर्तव्याचे पालन करणारा कठोर पोलिस अधिकारी आज भक्तांच्या वाटेवर भक्तीच्या सागरात रंगुन गेला होता .लाखो वारकऱ्यांच्या सेवेत उभ्या असलेल्या महाराष्ट्र पोलिस दलाचा मानवी चेहरा या एका घटनेतून पुन्हा एकदा समोर आला.

वारीत विठ्ठल भक्तांच्या सेवेसाठी झटणाऱ्या या महाराष्ट्र पोलिसांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल होत असून, “खाकीतील वारकरी”, असल्याचे दिसून आले.”सलाम त्या कर्तव्यदक्ष पोलीसांना” आणि ” आपले कर्तव्य हिच खरी सेवा हीच खरी भक्ती” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहेत. पंढरीच्या वारीचा बंदोबस्त करताना आलेल्या अनुभवात पोलिसांतील सहनशीलता, संवेदनशीलता, संयम आणि सत्कर्माची जाणीव पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या संत परंपरेत अत्यंत मानाचे स्थान असलेल्या वारीचा बंदोबस्त करायला मिळणे आणि वारकऱ्यांच्या पांढऱ्या पेहरावासोबत खाकीने मिसळून जाणे याची संधी अपवादात्मक अधिकारी, अंमलदारांना मिळते. असे कितीतरी पोलिस अधिकारी आहेत ज्यांनी आपल्या कर्तव्याचे काटेकोर पालन केले. आपल्या कर्तव्याचे पालन करणारा कठोर पोलिस अधिकाऱ्यामुळे इतर पोलिसांची प्रतिमा नक्कीच सुधारू शकते. पालखी मार्गावर अशा अनेक चांगल्या व्यक्ती आहेत. ज्यांच्यामुळे सामान्यांना वेगळी ओळख मिळते आहे. महाराष्ट्र पोलीसांच्या या कृतीने कदाचीत संत तुकोबारायांच्या सेवे लागी सेवक झालो, या अभंगाची प्रचीती येताना दिसते..फुगडी आणि गजर: रिंगण सोहळ्याच्या वेळी अनेक पोलीस कर्मचारी व महिला पोलीस वारकऱ्या सोबत फुगडी खेळताना दिसले. ‘माऊली माऊली’ चा गजर करत आनंदाने सहभागी झाले संवेदनशीलता: कडक शिस्तीची खाकी वर्दी वारीच्या वाटेवर पूर्णपणे वारकरी मय होऊन गेली. पालखी सोहळ्यात अनुचित घटना टाळण्यासाठी आणि भाविकां कडील ऐवज चोरीला जाऊ नये, या दृष्टीने पोलिस वारकऱ्यांच्या वेशात पालखीत सहभागी झाले होते. पोलिस कर्मचारी यांनी वारकऱ्यांसारखा वेश करून पालखीवर लक्ष ठेवले. आषाढी वारीत सुरक्षेचा कडक बंदोबस्त सांभाळता विठ्ठलभक्तीत तल्लीन होऊन वारकऱ्यांच्या सेवेत व भजनात लीन होणाऱ्या पोलिसांकडे नेहमीच समाज नकारात्मक दृष्टिने बघत असतो पण आज तीच खाकी आपल्या कर्तव्याचे पालन करताना दिसली महाराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या भावनांना सलाम यामुळे च त्यांना’खाकी वर्दीतील वारकरी’ असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही..



