संपादकीय
Trending

भेंडा येथे भव्य हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा दिनांक- 03/04/2026


भेंडा येथे भव्य हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न .नेवासा तालुक्यातील भेंडा बु येथे भव्य हनुमान जन्मोत्सव सोहळा श्री शेञ पावन दक्षिणमुखी हनुमान मंदिर भेंडा येथे आयोजित करण्यात आला होता. श्री संत नागेबाबांच्या पावन झालेल्या भूमीत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्या कृपेने व श्री संत नागेबाबांच्या आशीर्वादाने तसेच ह.भ.प. गुरूवर्य महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व हभप. गुरूवर्य मीराबाई महाराज मिरीकर,हभप स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या यांच्या प्रेरणेने या भव्य हनुमान जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. रविवार दिनांक 29 मार्च रोजी प.पू. हभप गुरूवर्य महंत भास्करगिरीजी महाराज श्री शेञ देवगड संस्थान यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण करण्यात आले होते. यावेळी हभप महंत रमेशानंदगिरीजी महाराज (हंडीनिमगाव), हभप अनंत महाराज तनपुरे(पंढरपूर), हभप निलेश महाराज वाणी(ब-हाणपुर), हभप वेदांताचार्य देविदास महाराज मस्के(नेवासा) यांची किर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती.तर महंत बालयोगी हभप अमोलजी महाराज (वकोडी,) यांनी काल्याचे किर्तनाने या भव्य हनुमान जन्मोत्सव सोहळ्याची सांगता झाली. या वेळी श्रीराम सेवा मंडळ, समस्त ग्रामस्थ, पंचक्रोशीतील भक्तानी अथक परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे