महंत प्रकाशानंदगीरी महाराज यांच्या हस्ते ओम नागेबाबा फर्निचर मॉल येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा, दिनांक – 08/08/2026
महंत प्रकाशानंदगीरी महाराज यांच्या हस्ते ओम नागेबाबा फर्निचर मॉल येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न. सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील भेंडा बु येथील राम भक्त बापुसाहेब नजन यांच्या ओम नागेबाबा फर्निचर मॉल येथे देवगड संस्थानचे महंत प्रकाशानंदगीरी महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे”
असे संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी वृक्षांचे महत्त्व सांगताना त्यांना आपले सोयरे मानले होते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण हा केवळ एक कार्यक्रम नसून ती आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. . त्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे .
आत्ताच झालेल्या नजन परिवार व धानापुणे परिवार यांच्या विवाहाच्या निमित्ताने स्नेह भेटीसाठी देवगड संस्थानचे महंत प्रकाशानंदगीरी महाराज यांनी भेंडा येथील ओम नागेबाबा फर्निचर मॉल भेंडा येथे भेट दिली. यावेळी नजन परिवाराकडून महंत प्रकाशानंदगीरी महाराजांचे संत पुजन करण्यात आले. तसेच हभप नागेबाबा संस्थान चे कादे महाराज, यांचेही संतपुजन करण्यात आले. यावे पांडुरंग अभंग साहेब यांचा सन्मान करण्यात आला. भेंडा येथील उद्योजक व रामभक्त बापुदादा नजन यांनी विविध कार्यक्रम आयोजित केले होते.यावेळी 111 झाडांचे वाटप करण्यात आले. यामध्ये रामफळ, सिताफळ , हनुमानफळ,वड, पिंपळ, गुलाब,बकुळ,शंकेश्वर, जासवंदी , रूद्राक्ष,कैलासपती ,पेरू,बेल, शमी, आवळा, आशा झाडांचा समावेश आहे. यावेळी बापुदादा नजन यांनी 5 मानस कन्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले. तसेच परिसरातील 11 वहान चालक यांचा 10 लाख रुपयांचा आरोग्य विमा काढण्यात आला. नागेबाबा अन्नपूर्णा योजनेसाठी आर्थीक मदत केली. नागेबाबा गोशाळे साठी 1 गाडी चारा देण्यात आला.
यावेळी काशिनाथ आण्णा नवले. व पांडुरंग अभंग साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बापुदादा नजन त्यांनी धार्मीक कार्याबरोबर सामाजिक सेवेचे जे व्रत अंगिकारले आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत अशा सामाजिक कामात राहण्यात आनंद होत असल्याची भावना यावेळी केलेल्या भाषणातून व्यक्त केली. महंत प्रकाशानंदगीरी महाराज यांनी आपल्या मनोगतात सांगितले की निसर्गाप्रति उतराई होण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले व परमेश्वराचे दर्शन वारीने पंढरपूरला जाऊन घेतानाच अशाही प्रकारे चराचरात परमेश्वर शोधून वृक्षांची लागवड व त्यांचे संवर्धन करणाऱ्या निसर्गप्रेमींना त्यात परमेश्वर भेटतो. भेंडा ही श्री संत नागेबाबांची पावन भूमी आहे. महंत परमपूज्य भास्करगीरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने व लोकनेते मारूतरावजी घुले पाटील यांच्यामुळे परिसराला चांगले वैभव लाभलेले आहे. यावेळी महंत प्रकाशानंदगीरी महाराज यांनी डिजे बंदी करणे काळाची गरज आहे असेही सांगितले. तसेच परिसरात डीजे बंद करण्याचे आवाहन केले आहे. सर्वानी एकञ येवून डिजेबंदी साठी प्रयत्न केला पाहिजे. असे आवाहन केले आहे. समाजात अनेक मुले व्यसनाधीन झाले आहे. ज्या परिवारातील मुले व्यसनाधीन झाले आहेत यांची परिस्थिती खुप बिकट आहे . आपले मुल निर्व्यसनी असेल तर परिवार सुख समाधानी असतो. असेही महंत प्रकाशानंदगीरी महाराज यांनी सांगितले. आपल्या कडे संपत्तीची कमी नाही तर संस्कारांची कमी आहे. जिथे गरज आहे तीथेच दानधर्म केला तर आपल्याला पुण्य लाभणार आहे. असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला मारूतराव नजन, तुकाराम मिसाळ, अशोकदादा मिसाळ, कैलास धानापणे सर, संदीप मिसाळ, बाबासाहेब नजन,दत्ताभाऊ काळे,आबातात्या काळे, शिवाजी तागड, कारभारीनाना मिसाळ,अंबादास गोंडे,दादा गजरे, पञकार सुखदेव फुलारी, पञकार संतोष औताडे, पञकार मंगेश निकम, नवले सर, किशोर मिसाळ,राजुभाऊ तागड, राजुचिंधे, कृष्णा गव्हाणे, देवेंद्र काळे,बबन मिसाळ , डॉ आढाव, नाना फुलारी गणेश महाराज चौधरी, सुनील गव्हाणे, बाळासाहेब वाघडकर, वाल्मीक लिंगायत, ओम नागेबाबा फर्निचर मॉल व अॅग्रो इंडस्ट्रीतील सर्व कर्मचारी वर्ग व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्योजक बापुदादा नजन यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे आभार मानले.



