ब्रेकिंग
Trending

भाजपचे ॠषीकेष शेटे यांच्यावर नेवासा येथे जमावाकडून हल्ला

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा                   दिनांक -28/08/2026 ———-  भाजपचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते ॠषीकेश शेटे यांच्यावर नेवासा येथे जमावाकडून  दगडफेक करत हल्ला.

 

सविस्तर माहिती- नेवासा येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा हिंदुत्ववादी कार्यकर्ते हृषीकेश शेटे यांच्या वर नेवासा येथे जमावाकडून हल्ला करण्यात आला आहे . अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांच्यावर २७ ऑगस्ट २०२६ रोजी एका संतप्त जमावाने हल्ला केल्याने  नेवासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते समजलेल्या माहिती नुसार संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमण काढण्याची मागणी ऋषीकेश शेटे यांनी केली होती.  .या तक्रारीवरून नगरपंचायतीचे पथक फेरीवाल्यांवर कारवाई करत होते.नगरपंचायतीच्या कारवाईच्या मागे शेटे असल्याचा गैरसमज फेरीवाल्यांमध्ये आणि अतिक्रमण धारकांमधे निर्माण झाला.अतिक्रमण कारवाई सुरू असतांना हृषीकेश शेटे यांची कार नेवासा येथून जात होती.संतापलेल्या जमावाने शेटे यांच्या कारची तोडफोड केली आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.या हल्ल्यात ऋषीकेश शेटे किरकोळ जखमी झाले असून, पोलिसांच्या समय सूचकतेमुळे त्यांचा जीव वाचला.पोलिसांच्या समय सुचकतेमुळे पुढील अनर्थ टळला .नेवासा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.या प्रकरणी सुमारे १०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी काही संशयितांना 7 जणांना ताब्यात घेतले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन साहेब, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, नीरज राजगुरू DYSP शेवगाव, जयदत्त भवर DYSP श्रीरामपूर, प्रताप दराडे पोलिस निरीक्षक नेवासा, PSI मोरे, यांनी घटनास्थळी धाव घेऊन मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.परिस्थिती नियंत्रणात आणली.नेवासा परिसरात तणावपूर्ण शांतता असून, नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये असे आवाहन मुमक्क सुदर्शन साहेब पोलिस अधीक्षक अहिल्यानगर यांनी केले आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे आरोपी वर कठोर कारवाई करणार असुन कायदा हातात घेऊ नये असे मुमक्का सुदर्शन त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे