ब्रेकिंग

ऑपरेशन मुस्कान अभियाना अंतर्गत राहुरी पोलिसांकडून तब्बल 108 मुलींचा शोध घेऊन दिले पालकांच्या ताब्यात….

संतोष औताडे –मुख्य संपादक, नेवासा               दिनांक -08/04/2026


राहुरी तालुक्यातील गुन्ह्यातील एका 17 वर्षीय अल्पवयीन अपहरण झालेल्या मुलीचा राहुरी पोलिसांकडून शोध*

ऑपरेशन मुस्कान अभियाना अंतर्गत राहुरी पोलिसांकडून तब्बल 108 मुलींचा शोध घेऊन दिले पालकांच्या ताब्यात….

राहुरी तालुक्यातील राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलगी वय 17 वर्ष ही दि.26/03/2026 रोजी सायंकाळी 12:00 वाजेच्या सुमारास राहते घरातून कोणाला काही एक न सांगता निघून गेली व परत आली नाही म्हणून मुलीचे अपहरण झाल्याबाबत मुलीच्या पालकांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 282/2026 BNS 137(2) प्रमाणे दाखल केला होता सदर मुलगी ही बीड जिल्हा शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत असले बाबत पो हे काॅ विकास वैराळ ह्यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती भेटल्याने त्यांनी सदर माहिती माननीय राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेगे साहेब यांना कळवल्याने त्यांनी सदरची माहिती राहुरी पोलीस स्टेशन कडील तपाशी अमलदार पोहे का वैराळ पो ना गणेश सानप पो काॅ अंबादास गीते यांना सदर मुलीची माहिती देऊन त्यांना राहुरी पोलीस स्टेशन येथे आज दिनांक 08/04/2026 रोजी मुलीचा शोध घेऊन ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाई मा. सोमनाथ घार्गे पोलिस अधीक्षक सो, अहिल्यानगर , मा. सोमनाथ वाघचौरे अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर , मा. जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन यांचे नेतृत्वात पो हे काॅ विकास वैराळ पोलीस नाईक गणेश सानप अंबादास गीते पो काॅ सागर नवले पो हे काॅ सचिन धनाड पो हे काॅ दरेकर पो ना वेताळ यांनी केली आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे