पोलीस मुख्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात पोलीस अधिकारी, अंमलदार व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; ७० रक्तपिशव्यांचे संकलन.

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा. दिनांक -27/11/2026
—————————————–
पोलीस मुख्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात पोलीस अधिकारी, अंमलदार व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; ७० रक्तपिशव्यांचे संकलन.
———————————————————-
दि. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणारे शूर पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच भारतीय सैन्य दलातील वीर जवान यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आज पोलीस मुख्यालय, अहिल्यानगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर रक्तदान शिबिर दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये अहिल्यानगर पोलीस दलातील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले.
या रक्तदान शिबिरामध्ये एकूण ७० रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. रक्त संकलनासाठी अर्पण रक्तपेढी व जनकल्याण रक्तपेढी, अहिल्यानगर यांनी मोलाचे सहकार्य केले.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात देशाच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरविरांचे स्मरण करून त्यांच्या त्यागाला रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमातून अभिवादन करण्यात आले.
रक्तदान हेच जीवनदान या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे देशसेवेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाने दिला.



