परमपूज्य गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय समन्वय बैठक संपन्न.

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा दिनांक 27/11/2026 ———————————–———देवगड येथील परमपूज्य गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय समन्वय बैठक संपन्न.
श्रीक्षेत्र देवगड : श्री गुरुदेव दत्त पीठ, श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे दि. १७ ते २४ डिसेंबर २०२६ दरम्यान आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व दि. २३ डिसेंबर रोजी होणाऱ्या भगवान श्री दत्तप्रभू जन्मोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी श्री दत्त भवन येथे प्रशासकीय समन्वय बैठक संपन्न झाली.
परमपूज्य गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीस उत्तराधिकारी पूजनीय स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांची उपस्थिती लाभली. बैठकीस प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी तहसीलदार संजय बिरादार, गटविकास अधिकारी श्री कासार साहेब, आरटीओ ऑफिसर विशाल बकले डॉक्टर एस.के. सुखाचे, प्रशासक श्री तागड व्ही आर, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, कुसमुडे, मंडळाधिकारी राणी सोनवणेआरटीओ अधिकारी विशाल बगले, व्यवस्थापक चांगदेव साबळे, महेंद्र फलटणी, नामदेव महाराज, बाळासाहेब कानडे, बाळासाहेब पाटील, अजय साबळे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, ग्रामप्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.
यंदा नाताळच्या सुट्ट्यांमुळे लाखो भाविक व पर्यटकांची गर्दी अपेक्षित असल्याने वाहतूक व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, भाविकांची सुरक्षितता, आरोग्य सेवा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, रस्ते दुरुस्ती, अखंड वीजपुरवठा व विशेष एसटी बससेवा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांनी उत्सवापूर्वी आवश्यक उपाययोजना पूर्ण करून भाविकांना सुरक्षित व सुलभ दर्शनाची व्यवस्था करावी, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीच्या प्रारंभी बजरंग विधाते यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रशासन, ग्रामपंचायती व संस्थान यांच्या समन्वयातून भाविकांची सेवा आणि श्रीक्षेत्र देवगडच्या धार्मिक परंपरेचे जतन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



