गुन्हेगारीब्रेकिंग
Trending

कापड बाजार परिसरात शहर वाहतूक शाखा, अहिल्यानगर व महानगरपालिका अतिक्रमण पथकाची विशेष कारवाई

संतोष औताडे- मुख्य संपादक ,नेवासा                  दिनांक -08/04/2026


सविस्तर माहिती- कापड बाजार परिसरात शहर वाहतूक शाखा, अहिल्यानगर व महानगरपालिका अतिक्रमण
पथकाची विशेष कारवाई
दि. ०८/०४/२०२६ रोजी अहिल्यानगर शहर वाहतूक शाखा व महानगरपालिका अतिक्रमण पथक यां
संयुक्त कारवाई करून एम. जी. रोड कापड बाजार परिसरातील धरतीचौक, शहजीचौक, महाविर कॉर्नर,
सर्जेपुरा, तेलीखुंट चौक, नवीपेठ येथील रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानदारांवर, तसेच
तात्पुरत्या स्टॉलधारक व हातगाडी चालकांवर कारवाई करण्यात आली.
सदर कारवाईपूर्वी दि. ०६/०४/२०२६ रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १०२ / ११७ प्रमाणे ३८
नोटीस देऊन संबंधितांना सूचना करण्यात आली होती. तरीदेखील काही दुकानदारांनी सूचनांचे पालन न करता
रस्त्यावर दुकाणातील साहित्य मांडून विक्री सुरू ठेवली होती.
त्यामुळे कारवाईदरम्यान एकूण २० दुकानदार व हातगाडी चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच ३
हातगाड्या, ५ टेबल, ३ जाहिरात फलक, ५ स्टूल, ३ खुर्ची व ५ लोखंडी स्टॉल जप्त करण्यात आले. तसेच
सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे रस्त्यावरती उभे केलेल्या एकुण ३३ वाहनांवरती
मोटार वाहन कायदया अन्यये दंडात्मक करावाई करण्या आलेली आहे.
याशिवाय दिनांक ०६/०४/२०२६ रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १०२/११७ अन्वये नोटीस
बजावलेल्या पैकी ४ दुकानदारांना मा. न्यायालयात हजर करण्यात येऊन मा.न्यायालयाने प्रत्येकी रु. १००० प्रमाणे
एकूण रु४००० दंड वसूल करण्यात आला.
सदर कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस
अधीक्षक, अहिल्यानगर, डॉ. दिलीप टिपरसे, उपविभागीय पोलीस अधिकरी, अहिल्यानगर शहर विभाग यांचे
आदेशान्वये शहर वाहतुक शाखेचे प्रभारी अधिकारी पोनि / बाबासाहेब बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली अधिनस्त
पोलीस अधिकारी / अंमलदार पोउपनिरी/शामुवेल गायकवाड, पोउपनिरी/ मन्सुर सय्यद, सफौ / रामराव शिरसाठ,
सफौ / कोडम, पोहवा / विष्णु खेडकर, पोकों/बाप्पु उंडे, पोकॉ/ राठोड, पोकॉ/शेटे तसेच महानगर पालिका अतिक्रमाण
विभागाचे प्रमुख श्री. अदित्य बल्लाळ साहेब, श्री नितीन इंगळे साहेब अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी,
वॉर्डन यांच्या संयुक्त सहभागातून करण्यात आली.
तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण
होईल अशा प्रकारे जाहिरात फलक, दुकाणातील विक्रीचे साहित्य, पुतुळे, हातगाडी इ. साहित्य लावुन अडथळा
निर्माण करु नये व प्रशासनास सहकार्य करावे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे