संपादकीय
Trending

श्री विठ्ठल अर्बन को अॅ.क्रे सो. लि संस्थेस गतवर्षी 3 लाख 67 हजार रुपये नफा.

संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा               दिनांक -03/04/2026.


श्री विठ्ठल अर्बन को आॅ.क्रे सो लि संस्थेस गतवर्षी 3 लाख 67 हजार रुपये नफा. सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री विठ्ठल अर्बन को आॅ क्रे सो लि हि पतसंस्थेची सन 2018 साली स्थापना झाली असून सभासद संख्या 7 इतकी होती. व भागभांडवल अवघे 5 लाख रुपये इतके होते. हि संस्था सभासद, ठेवीदार, कर्जदार, व सर्वसामान्य नागरिकांचा विश्वासास पाञ ठरली आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात सभासद संख्या 3500 असुन 31 मार्च 2026 रोजी 3 लाख 67 हजार 44 रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे. 31 कोटी 27 लाख रुपयांची आर्थिक उलाढाल केली असून. संस्थेने सामाजिक शैक्षणिक धार्मिक कार्यात सहभागी होऊन विविध उपक्रम राबविले आहे. ठेविदार, कर्जदार, सभासद, यांनी विशेष सहकार्य केल्यामुळे ही संस्थेची यशस्वी वाटचाल करीत आहे.चालु आर्थिक वर्षात वसुली यंत्रणा व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने हे शक्य झाले आहे. येणाऱ्या काळात चांगल्या प्रकारे सेवा देऊन संस्था प्रामाणिकपणे काम करत राहील असे
चेअरमन कृष्णा गव्हाणे.व व्हा चेअरमन संतोष औताडे
यांनी सांगितले आहे. यावेळी संस्थेचे चेअरमन कृष्णा गव्हाणे, व्हा चेअरमन संतोष औताडे (पञकार), सर्व संचालक मंडळ, मॅनेजर सुरेश दरवडे, क्लार्क कृष्णा मंडलिक, भगवान फुलारी, कॅशियर शुभम आढागळे , दैनिक बचत प्रतिनिधी बाळासाहेब तागड, प्रवीण उंडे, महेश गव्हाणे, अमोल दरवडे , चंद्रकला निकम मॅडम,यांनी अथक परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे