आरोग्य व शिक्षण
Trending

कृष्णा शरद भोसले याची नवोदय विद्यालयात निवड

संतोष औताडे-मुख्य संपादक,नेवासा.                         दिनांक -22/03/2026


सविस्तर माहिती-नेवासा तालुक्यातील भेंडा बु येथील कृष्णा शरद भोसले याची नवोदय विद्यालयात निवड झाली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाळा येथील इयत्ता पाचवी चा विद्यार्थी कृष्णा भोसले याने 95 टक्के गुण मिळवून जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश केला आहे.जिद्द चिकाटी, अभ्यासातील सातत्य कठोर परिश्रमाच्या जोरावर कृष्णा ने हे यश संपादन केले आहे.अभ्यासात सातत्य असल्यास यश मिळतेच मेहनत, सातत्य गरजेचे असते. त्यातूनच यश मिळते. दोन वर्षे नवोदय निवडीचा ध्यास विद्यार्थ्यांनी मनात ठेवला होता. ती वाटचाल आज फळाला आली. ही निवड भविष्यातही प्रेरणा देईल. शाळेतील इतर विद्यार्थ्यांनीही नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पुर्व परीक्षेसाठी तयारी विद्यार्थी यांनी करावी, सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षण विभागातील शिक्षक व मुख्याध्यापकांच्या संयुक्त मार्गदर्शनामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे. या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक क्षमता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जाणीव अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या यशामागे वर्गशिक्षक अशोक पंडित,शरद भोसले, राजकन्या भोसले, मुख्याध्यापक पोपट घुले,यांचे मार्गदर्शन लाभले. गटशिक्षणाधिकारी संजय कळमकर केंद्र प्रमुख रवींद्र कडु यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


 

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे