आरोग्य व शिक्षण
Trending

बाभुळखेडा येथे मोफत नेञ तपासणी व मोतिबिदुं शस्ञक्रिया शिबिर संपन्न.

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा दिनांक-30/05/2026

माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त बाभुळखेडा येथे मोफत नेञ तपासणी व मोतिबिदुं शस्ञक्रिया शिबिर संपन्न.

सविस्तर माहिती- राज्याचे मा.जलसंधारण मंञी व नेवासा तालुक्याचे मा.आमदार शंकररावजी गडाख पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन पुणे येथील सुप्रसिद्ध बुधराणी हाॅस्पीटल व मा.ना.शंकररावजी गडाख पा. मिञमडंळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बाभुळखेडे ग्रामपंचायत व सोसायटी यांच्या सहकार्याने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिरात १०५ जणांची मोफत नेञ तपासणी करण्यात आली.तसेच मोतीबिदुं, काचबिदुं, टेरीजियम, लासुर, लॅसिक आदी वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. शस्ञक्रियेची गरज असलेल्या रुग्णांची मोतीबिदुं शस्ञक्रिया पुणे येथे बुधराणी हाॅस्पीटलमध्ये मोफत करण्यात येणार आहे.
यावेळी बुधराणी हाॅस्पीटलच्या काॅर्डीनेटर मनिषा कोरडे मॅडम व मीरा पटारे मॅडम यांनी उपस्थित रुग्णांची नेञतपासणी केली.
यावेळी शिबीर प्रसंगी सरपंच ज्ञानेश्वर औताडे, हरीभाऊ विधाटे, केशवराव विधाटे, रामभाऊ विधाटे, रामेश्वर विधाटे, आबासाहेब मते, व्हा.चेअरमन ज्ञानेश्वर विधाटे, नवनाथ नवले, अशोकराव विधाटे, राजेद्रं हुसळे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिर यशस्वी होण्यासाठी मा.ना.शंकररावजी गडाख पा.मिञमडंळाचे अध्यक्ष महेश औताडे यांनी विशेष परीश्रम घेतले तर शिबीर आयोजक सरपंच ज्ञानेश्वर औताडे यांनी सर्वांचे आभार मानले.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे