भेंडा येथील न्यू लिटील स्टार प्रि प्रायमरी स्कूल मध्ये बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा.
संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा दिनांक-13/03/2026
सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील भेंडा बु येथील न्यू लिटील स्टार प्रि प्रायमरी स्कूल मध्ये 69 विद्यार्थी असून यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन जिजामाता विद्यालयाचे माजी प्राचार्य भुसारी सर यांच्या हस्ते करण्यात आले.बाल आनंद मेळाव्यात 35 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
शालेय मुलांसाठी आयोजित केला जाणारा एक आनंददायी आणि शैक्षणिक उपक्रम आहे, जो मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, कलागुणांना वाव देण्यासाठी आणि ‘कमवा व शिका’ या संकल्पनेतून व्यवहारज्ञान, सांघिक भावना व आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. या मेळाव्यात लहान मुलांचे खाद्यपदार्थ स्टॉल्स, लावण्यात आले होते. बाल आनंद मेळाव्या निमित्ताने खाऊ गल्लीचे आयोजन करण्यात आले होते.

संदीप गव्हाणे, संजय नवले, सुनील मुळे, बाबासाहेब चौधरी,सुरेश तागड, गावडे सर, बाबासाहेब नवले,सचिन पुंड,शुभम गव्हाणे, अजय निकम, नाना गव्हाणे, गणेश महाराज चौधरी, बापूसाहेब औताडे तसेच परिसरातील नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्राचार्य सौ.अंजली गोरे मॅडम यांनी उपस्थित पालकांचे आभार मानले.




