ब्रेकिंग
Trending

भेंडा येथील मुळा कालव्यात बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

संतोष औताडे-मुख्य संपादक,नेवासा,                 दिनांक -20/03/2026


                   

 भेंडा येथील मुळा कालव्यात बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील भेंडा बु येथील ज्ञानेश्वर कारखाना पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या मुळा उजव्या कालव्यात स्वप्नील लक्ष्मण मगरे ( वय-30) रा.पाथरवाला ,ता-अंबड, जिल्हा जालना येथील युवक निफाड येथुन मढी येथे दर्शनासाठी निघाले असता भेंडा बु येथील कालव्यात सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास आंघोळीसाठी गेला असता बुडाल्याची घटना घडली होती. स्थानिक नागरिक व पोलीस प्रशासनाने अथक प्रयत्न करून देखील कालपर्यंत या तरूणाचा काही शोध लागला नाही.

आज दिनांक 18 मार्च रोजी पहाटे पासूनच पुन्हा पोलिस प्रशासन, स्थानिक नागरिक व अहिल्यानगर महापालिका प्रशासन/अग्निशमन दलाचे कर्मचारी शुभम गावडे,सुरज पोकळे, मच्छिंद्र चितळे,करण राठोड, सोमनाथ गीते, श्रीराम आव्हाड, कृष्णा सांगळे ,पञकार संतोष औताडे- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण प्रशिक्षणार्थी (आपदा मिञ) अहिल्यानगर

 यांनी ऐअरबोट, गळ, हुक व दोरीच्या सहाय्याने शोधमोहीम सुरू केली होती. यावेळी नेवासा येथील तहसीलदार संजय बिराजदार साहेब, पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार साहेब, पाटबंधारे विभागाचे कर्मचारी,किशोर मिसाळ, नेवासा पोलिस स्टेशन चे पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांनी विशेष परिश्रम केले .आज भेंडा खु येथील कॅनॉल मध्ये या तरूणाचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याची माहिती स्थानिकांनी दिल्यानंतर सर्वांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून या तरूणाच्या डोळ्यावर व डोक्यावर जखमा असल्याचे दिसून आले. सदर मृतदेह अॅंबुलन्स ने नेवासा फाटा येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे