विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेस व इतर वाहनांची सोमनाथ वाघचौरे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या पथकाची तपासणी मोहीम.

संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा, दिनांक -03/09/2026
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेस व इतर वाहनांची सोमनाथ वाघचौरे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या पथकाची तपासणी मोहीम.
सविस्तर माहिती- श्रीरामपूर शहरात आज रोजी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेस व इतर वाहनांची तपासणी करून दंडात्मक कारवाई मोहीम राबविण्यात आली होती.
विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने
मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ
वाकचौरे सो तसेच श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर सो यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर पोलीस
ठाणे पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर पोलीस ठाणे, शिर्डी वाहतूक शाखा व श्रीरामपूर RTO

करणाऱ्या स्कूल बसेस तसेच इतर वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची वाहनाची फिटनेस, परवाना, विमा, परमिट, प्रदूषण
प्रमाणपत्र, चालकाचा वाहन चालविण्याचा परवाना, वाहनातील सुरक्षा साधने, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार पेटी,
आपत्कालीन दरवाजा, सीसीटीव्ही / जी पी एस सुविधा, वेग मर्यादा तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चालकाची
महत्त्वाची भूमिका असते.

त्यामुळे चालकाचे ड्रायव्हिंग लायसन आहे का ? तसेच तो मद्य किंवा इतर अमली पदार्थांच्या
नशेखाली आहे किंवा कसे याबाबत सक्त तपासणी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून
वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करणे, धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे, नियमांचे उल्लंघन करणे
इत्यादी बाबी आढळतात का, याचीही पाहणी करण्यात आली.
तपासणी दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायदा व संबंधित नियमांनुसार
आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात आली असून त्यामध्ये एकूण 66 वाहनांची तपासणी करण्यात आली असून
खालील प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

1) लायसन नॉट कॅरी-02
2) पीयूसी-01
3) चालक युनिफॉर्म-06
4)
अतिरिक्त प्रवासी-06
5) फायर बॉटल-06
6) प्रथमोपचार पेटी-05
7) फिटनेस – 02
8) इमर्जन्सी एक्झिट सुस्थितीत नसणे- 03
9) सेपटी काचा व जाळी बाबत 02
याप्रकारे 33 वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
अशा प्रकारचा स्कूल बस तपासणीचा प्रथमच शहरामध्ये विशेष ड्राईव्ह असल्याने काही वाहन चालकांना
नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत समज देऊन सोडण्यात आलेले आहे. परंतु यापुढे अधिक सक्त पणे सदरची
मोहीम राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्यामुळे स्कूल बस चालक,
मालक, शाळा प्रशासन व पालकांनी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसंदर्भातील सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



