ब्रेकिंग
Trending

अहिल्यानगर येथील पत्रकार चौक येथे वाहतुक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर शहर वाहतुक शाखेची विशेष कारवाई.

संतोष औताडे -मुख्य‌‌‌ संपादक, नेवासा  दिनांक -11/03/2026.


पत्रकार चौक येथे वाहतुक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर शहर वाहतुक शाखेची विशेष कारवाई.
सविस्तर माहिती -दि. ०९/०३/२०२६ रोजी पत्रकार चौक व दिनांक १०/०३/२०२६ रोजी प्रोफेसर चौक येथे आचानक
नाकाबंदी करुन नाकाबंदी दरम्यान वाहतुक नियमभंग करणारे वाहनचालकांविरुध्द मोटार वाहन कायद्याप्रमाणे
वाहनास काळी काच ०३, लायसन्स सोबत न बाळगणे ३५, लायसन्स नसणे ०७, ट्रिपल शिट वहन चालवणे
१३, वाहनास नंबर प्लेट नसणे / फॅन्सी नंबर प्लेट बसवणे ४८, वाहन चालवितांना मोबाईल फोनवर बोलने
०३ इतर १२६ आशा एकुण २३५ ई चलान कारवाई करण्यात आलेल्या असुन ३८७००/- रु रोख दंड वसुल
करण्यात आलेला असुन अनपेड एकुण दंड २४६६५० /- करण्यात आलेला आहे.
सदर कारवाई श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस
अधीक्षक, अहिल्यानगर, डॉ. दिलीप टिपरसे, उपविभागीय पोलीस अधिकरी, अहिल्यानगर शहर विभाग यांचे
आदेशान्वये शहर वाहतुक शाखेचे प्रभारी अधिकारी पोनि / बाबासाहेब बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली अधिनस्त
पोलीस अधिकारी / अंमलदार, पोउनि मन्सुर सय्यद, पोउनि असिफ शेख, पोउनि अन्सार शेखे, सफौ. रामराव
शिरसाट, सफौ. रियाज इनामदार पोहवा खेडकर, पोशि. मधुकर ससे, पोशि. उंडे, पोशि. खराडे पोशि. सतिश
दळवी, पोशि. प्रविण खंडागळे व वॉर्डन, अरविंद चौटिले, निखिल कारखेले, विशाल खताडे यांचेकडुन
कारवाई करण्यात आलेली आहे.
तरी सर्व नागरीकांना अव्हाण करण्यात येते की, अल्पवयीन मुलांस वाहन चालवण्यास देवु नये तसेच
आपल्या वाहनांच्या काळ्या काचा करणे, वाहनांना नोंदणी क्रमाक न लावणे किंवा फॅन्सी नंबर प्लेट लावने,
फटाका सायलेन्सरचा वापर करणे, मद्य सेवन करुन वाहन चालविने या सारख्या वाहतुक नियमांचे भग न करता
वाहतुक नियमांचे पलन नियमित पणे करण्यात यावेत.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे