ब्रेकिंग
Trending

स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी विष्णू भागवत यांचा अपर पोलीस महासंचालक श्री कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते सन्मान.

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा.                  दिनांक – 09/02/2026              विष्णू ञिंबक भागवत अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी यांचा अपर पोलीस महासंचालक श्री कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते सन्मान.

अहिल्यानगर जिल्हा  पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर या ठिकाणी नेमणुकीस असलेले विष्णू भागवत असतांना, एम.आय.डी.सी.
पोलीस ठाणे गु.र.नं. 67/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309 (4), 3(5) प्रमाणे
गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपींनी ड्रायव्हर व क्लिनर यांना चाकुने जिवे ठार मारण्याची धमकी देवुन त्यांचे
ताब्यातील 9,67,200/- रुपये किमतीचे गव्हाचे 953 कट्टे जबरीने चोरुन नेलेले आहेत. नमुद
गुन्ह्यामध्ये तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढुन आरोपी नामे 1) अर्जुनसिंग
नारायणसिंग सरदार वय 41 वर्षे, रा. कोलारस, ता. कोलारस, जि. शिवपुरी, मध्यप्रदेश, 2) सागरसिंग
गुरजंदसिंग सरदार वय 44 वर्षे, रा. कोलारस, ता. कोलारस, जि. शिवपुरी, मध्यप्रदेश, 3) कल्ला
शब्बीरा कोहरी वय 25 वर्षे, रा. कोलारस, ता. कोलारस जि. शिवपुरी, मध्यप्रदेश, 4) रतीलाम
मदनलाल मदनलाल कोहरी वय 40 वर्षे, रा. सबालगड, ता. सबालगड, जि. मुरैना, मध्यप्रदेश यांना
ताब्यात घेवुन त्यांचेकडुन एकुण 35,40,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या उत्कृष्ट कामगिरीबाबत आपणास प्रशस्तीपत्र देवुन सन्मानित करण्यात येत आहे. असे या पञात म्हटले आहे. विष्णू भागवत हे नेवासा तालुक्यातील भेंडा या ग्रामीण भागातील उत्कृष्ट कबड्डी खेळाडू असून ते अत्यंत गरीब कुटुंबातील असून. विष्णू भागवत यांनी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात भरती झाल्यापासून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.त्यांनी यापूर्वी तोफखाना पोलीस स्टेशन तसेच अहिल्यानगर MIDC  पोलिस स्टेशन येथे उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्या या सन्मानामुळे अहिल्यानगर पोलीस दल व मिञ परिवार यांच्या वतीने अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे