
संतोष औताडे-मुख्य संपादक,नेवासा दिनांक-24/09/2025
10 वर्षापासून तपासावर असलेला गुन्हा उघड करून अपहरीत मुलीचा AHTU कडुन शोध.
सविस्तर माहिती -दि. 14/10/2015 रोजी अज्ञात आरोपीत मजकूर याने अपहरीत
अल्पवयीन मुलीस आशिर्वादनगर, श्रीरामपूर जि. अहिल्यानगर येथुन फुस लावुन पळवुन नेले होते. सदर
बाबत श्रीरामपूर शहर पो स्टे गुन्हा नं । २९५/२०१५ भा द वि क ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर
गुन्ह्याचा तपास न लागल्याने सदरचा गुन्हा अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष (AHTU) अहिल्यानगर
यांचेकडेस गुन्ह्यास भादवि कलम ३७० हे वाढीव कलम लावून तपासकामी वर्ग करण्यात आला होता. सदर
गुन्ह्याचा तपास पोनि इंगळे हे करत होते.
वरील नमुद गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) अहिल्यानगर येथे
वर्ग झाल्यानंतर पो.नि. राजेंद्र इंगळे व शाखेचे अंमलदार यांनी वेगवेगळ्या मार्गाने व गुप्त बातमीदारामार्फत
माहिती काढुन शोध घेत असताना सदरची मुलगी नामे स्वाती राजेंद्र भिवसने रा. आशिर्वादनगर, श्रीरामपूर
ही मिळून आलेले असून सदर अपहरीत मुलगी, तसेच तिचे सोबत ३ मुले असे मिळून आल्याने त्यांना
पुढील तपासकामी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला हजर करण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई मा.श्री सोमनाथ घार्गे सो., पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, श्री वैभव
कलुबर्मे सो., अपर पोलीस अधिक्षक अहिल्यानगर, श्री गणेश उगले सो. पोलीस उपअधिक्षक अहिल्यानगर,
यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, पोहेकॉ / २०२४ समीर सय्यद, मपोहेकॉ १२४६
/ अर्चना काळे, मपोहेकाँ/ १०८२ अनिता पवार, मपोकाँ/१३६५ छाया रांधवन, चालक पो.कॉ. २६७३/
एस.एस. काळे सर्व नेम – अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष (AHTU) अहिल्यानगर, यांनी केली आहे.