ब्रेकिंग

होस्टेलच्या बाथरूममध्ये अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा               दिनांक- – 25/02/2026


सविस्तर माहिती- होस्टेलच्या बाथरूममध्ये इयत्ता 6 वी च्या अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या. सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील बेल्हेकर गृप आॅफ इन्स्टिट्यूट भानसहिवरा येथील जय मल्हार हाऊस येथे राहणाऱ्या व ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कूल मध्ये  शिकणाऱ्या इयत्ता 6 वी मधील विद्यार्थी  सार्थक विक्रम कोकरे वय वर्ष 12 राहणार पाचुंदा तालुका नेवासा या विद्यार्थ्याने हॉस्टेल च्या बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिनांक 24/02/2026 तारखेला 13.00 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. सदर मुलाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सदर घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील साहेब व पोलीस उपनिरीक्षक ससाणे साहेब यांनी घटनास्थळी धाव घेतली.व तेथील स्थानिक शिक्षक व विद्यार्थी यांच्या मदतीने अॅंबुलन्स ने सुरवातीला नेवासा फाटा येथील आत्मदीप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले . व नंतर नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. महाविद्यालयातील व होस्टेल मधील सर्व CCTV फुटेज चेक करण्यात आले.असुन यात कोणतीही प्रकारची आक्षेपार्ह दिसून आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आत्महत्या बाबत कोणतेही कारण समोर आलेले नाही. सदर घटनेचा तपास नेवासा पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे