ब्रेकिंग

आगामी सण उत्सवाचे अनुशंगाने अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर यांचे अधिनस्त 17 पोलिस स्टेशन हद्दीत ऑपरेशन ऑल आऊट कारवाई.

User Rating: Be the first one !

संतोष औताडे -मुख्य संपादक,नेवासा दिनांक -19/02/2026


आगामी सण उत्सवाचे अनुशंगाने अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर यांचे अधिनस्त 17 पोलिस स्टेशन हद्दीत ऑपरेशन ऑल आऊट कारवाई.
सविस्तर माहिती- शिवजयंती तसेच आगामी सण उत्सवाचे पार्श्वभुमीवर ा. श्री. सोमनाथ वाकचौरे, अपर पोलीस
अधीक्षक, श्रीरामपुर यांनी श्रीरामपुर विभागातील अधिनस्त १७ पोलीस स्टेशन हददीत दि.१७/०२/२०२६ रोजी
११.०० ते २१.०० वा. चे दरम्यान ऑपरेशन ऑल आऊटचे आयोजन केले होते. ऑल आऊट ऑपरेशन मध्ये
समन्स, B.W, NBW वॉरंट बजावणी करणे, आर्म अॅक्ट कारवाई करणे, दारुबंदी व जुगार कायदयाअंतर्गत
कारवाई, पाहिजे व फरार आरोपी चेक करणे, संशयीत वाहने व विना नंबर वाहने यांचेकवर कारवाई, NDPS
कायदया अंतर्गत कारवाई करणे, अवैध गोवंश कत्तल व वाहतुक करणाऱ्यावर कारवाई करणे असे इत्यादी
कारवाई करणेबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सुचना व
मार्गदर्शन करुन सदर ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान खालीलप्रमाणे कार्यवाही करुन घेण्यात आलेली आहे.
समन्स, B. W, NBW वॉरंट बजावणी :-
श्रीरामपुर विभागात (अहिल्यानगर उत्तर विभाग) ऑल आऊट ऑपरेशन मोहीमे अंतर्गत ६१२
समन्सची बजावणी करण्यात आली असुन मा.न्यायालयाने समन्स काढुन देखील हजर न राहीलेल्या आरोपी
/ साक्षीदार यांचेविरुध्द बेलेबल वॉरंट काढण्यात आलेल्या पैकी २१२ आरोपी /साक्षीदार यांना वॉरंटची
बजावणी करण्यात आलेली आहे. तसेच समन्स व बेलेबल वॉरंट काढुन देखील काही आरोपी / साक्षीदार
हजर न राहिल्याने त्यांचे विरुध्द मा. न्यायालयाने पकड वॉरंट काढण्यात आलेले असे १०० आरोपीं पैकी ३१
आरोपी यांना अटक करण्यात आलेली असुन ६९ आरोपी हे मा. न्यायालयासमोर हजर झालेले आहेत.
दारुबंदी व जुगार कायदयाअंतर्गत कारवाई 
सदर मोहीमेत दारुबंदी कायदयातंर्गत ४२ गुन्हे दाखल करण्यात आलेले असुन त्यामध्ये
एकुण ८०,५००/- किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच जुगार कायदयान्वये १८ गुन्हे
दाखल करण्यात आलेले असुन एकुण १,५४, ४४०/- किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला गु.र.नं. ११९५ / २०२६ आर्म अॅक्ट ४ / २५ प्रमाणे गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गु.र.नं. ८२ / २०२६ आर्म अॅक्ट ४ / २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे कारवाई :-
शिर्डी पोलीस स्टेशन हददीमध्ये हददपार नुसार म.पो. कायदा कलम ५६ अन्वये हददपार केले असतांना देखील त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका जणांविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे शिर्डी पो.स्टे. येथे
कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम अन्वये कारवाई :-
संगमनेर शहर पोलीस स्टेशन हददीमध्ये मदिनानगर, गल्ली नं. २, संगमनेर येथे काटवनात
कत्तल करण्याचे उददेशाने बांधण्यात आलेली ३०,००० /- रु. कि.ची गाय मिळुन आल्याने अज्ञात आरोपी
विरुध्द महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन १९९५ चे सधारीत कलम २०१५ चे कलम ५,९ प्रमाणे
प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम ३,११ प्रमाणे संगमनेर शहर पो.स्टे. येथे गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
सदरची कारवाई ही मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. सोमनाथ
वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस
अधिकारी, श्रीरामपुर, श्री. कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर, श्री. अमोल भारती,
उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी, श्री. निरज राजगुरु, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव
उपविभाग तसेच अधिनस्त सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी व पोलीस अंमलदार
यांनी केली आहे

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे