ब्रेकिंग
Trending

भेंडा येथे दरोडा 8 तोळे सोन्यासह रोकड लंपास.

संतोष औताडे – मुख्य संपादक नेवासा,                दिनांक – 11/02/2026


सविस्तर माहिती-  नेवासा तालुक्यातील भेंडा येथे पाच ते सहा जणांच्या टोळक्याने मध्यरात्री सशञ दरोडा टाकल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत नेवासा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असून जयश्री दौलत बर्डे वय-33 वर्ष, व्यावसाय शिक्षिका (जिजामाता पब्लीक स्कुल, भेंडा) रा.बर्डेवस्ती, भेंडा बु
ता. नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांनी
समक्ष घरी हजर असताना तक्रार दिली आहे. भेंडा येथे त्यांचे पती दौलत बर्डे, सासरे मच्छींद्र बर्डे, सासु
विमलबाई, व एक मुलगी ओजस्वी असे मिळुन राहतो. मी तसेच माझे पती शिक्षकाची नोकरी करुन आमचे परिवाराचा
उदरनिर्वाह करतो. आमचे चार रुमचे घर असुन पुर्व बाजुचे बेडरुम मध्ये सासु सासरे यांचे साहित्य ठेवले आहे.
घरातील रुममध्ये प्रवेश करण्यासाठी घरामध्येच दरवाजे आहेत.
दिनांक 09/02/2026 रोजी रात्री 11/00 वा. चे सुमारास आम्ही सर्व जेवण करुन मी माझे पती व मुलगी माझे
बेडरुम मध्ये झोपले होते. मध्यरात्री दिनांक 10/02/2026 रोजी अंदाजे 02/00 वा. चे सुमारास सासु विमलबाई
यांचा आरडा ओरड करण्याचा आवाज आला, सासु ओरडत होत्या की घरात कोणीतरी घुसले आहे. तेव्हा माझे पती
यांनी सासु सासरे यांचे रुममध्ये जावुन बघीतले असता कोणीतरी बोहेरून दरवाजा तोडण्याच प्रयत्न करीत होते.
माझे पती यांनी सासु सासरे यांना आमचे बेडरुममध्ये आणले व आमचे घरातील परवाना असलेली रायफलचा धाक
दाखवुन घरात घुसलेल्या चोरांना घाबरविण्याचा प्रयत्न केला. घरात अचानक 4 ते 5 अनोळखी व्यक्ती
घुसल्याने त्यापैकी एकाने त्याचे हातातील पिस्टल सदृष्य वस्तुने माझे पती यांना धाक दाखवुन पती यांचे हातातील
रायफल हिसकावुन घेतली व त्यांच्यापैकी एकाने त्याचे हातातील चाकुच्या मागच्या बाजुने माझे पती यांचे डाव्या
डोळ्याच्या वर कपाळावर मारहाण केली.
त्यानंतर ते सर्व 5 इसम आमच्या बेडरुमध्ये आले, त्यापैकी एकाने त्याचे हातातील चाकुचा आम्हाला धाक
दाखवुन शांत राहण्याचा इशारा करत होता. त्यांच्या पैकी तिघांनी माझे पती यांचे हात पाय बांधुन त्यांना बेडवर
झोपवुन दिले. सासरे व मुलगी यांना देखील बेडच्या एका बाजुला व सासु यांना बेडच्या खाली बसविले. त्यापैकी
एकाने मला चाकु दाखवुन घरातील कपाटाच्या चाव्या मागीतल्याने मी घाबरून कपाटाच्या चाव्या त्यांना दिल्या.
कपाटाच्या चाव्या मिळाल्यावर घरातील आमच्या बेडरुम मधील सर्व कपाट उघडुन सोन्याचे दागीने व काही रोख
रक्कम काढुन घेतली, त्यानंतर सासु विमलबाई यांचे रुम मधील कपाटाच्या चाव्या घेवुन त्यांचे रूम मधील कपाट
उघडुन त्यातील सोन्याचे दागीने व रोख रक्कम देखील काढुन घेतली. घरात घुसलेल्या इसमांपैकी काही हिंदी भाषेत
व काही मराठी भाषेत बोलत होते. त्यानंतर देखील त्यांनी मला चाकुचा धाक दाखवुन अजुन कुठे काही ठेवले आहे
का ? असे विचारले त्यावर मी त्यांना नाही म्हणाले असता त्यांनी आमचे सर्वांचे मोबाईल ताब्यात घेतले. घरातुन
काढुन घेतलेले दागीने एका टॉवेलमध्ये गुंडाळुन माझे पती यांचे बॅगमध्ये टाकुन घरातील रायफल सोबत घेवुन घराचे
सर्व दरवाजे बाहेरुन बंद करुन सुमारे 03/00 वाजता चे सुमारास ते सर्व घरातुन निघुन गेले. आम्ही सर्व खुप
घाबरलेलो असल्याने आम्ही घरामध्ये शांत बसुन राहीलो. सुमारे 05/00 वाजणेचे सुमारास घरातील खिडकीमधुन
शेजारी राहणारे दत्तात्रय क्षिरसागर यांना आम्ही आवाज दिला. काही वेळाने दत्तात्रय क्षिरसागर हे आमचे घरी
आल्याने त्यांनी आमचे घराचे दरवाजे उघडले व आम्ही घराबाहेर येवुन बघीतले असता माझा तसेच माझे पती व
सासु यांचा मोबाईल घराबाहेर मिळुन आला. तेव्हा माझे पती यांनी त्यांचे मोबाईलवरुन पत्रकार नामदेव शिंदे यांना
फोन करुन पोलीसांना कळवीण्याचे सांगितले.
आमचे घरातुन बळजबरी चोरून नेलेल्या मुद्देमालाचे वर्णन खालील प्रमाणे –
अ) माझे बेडरुममधील चोरी झालेल्या वस्तुंचे वर्णन पुढील प्रमाणे
1) 20,000/- रुपये किंमतीचे 4 ग्रॅम वजनाचा सोन्याचा पिळा जु.वा. किं.अं.2) 30,000/- रुपये रोख रक्कम 500/- रुपये किमतीचे भारतीय चलनाच्या 60 नोटा
3) 1200/रु रोख रक्कम पतीचे खिशातील पाकीटात असलेली तसेच पाकीटातील आधार, पँन कार्ड व ईतर
कागदपत्रे
ब) सासु विमलबाई यांचे बेडरुम मधील चोरी झालेल्या वस्तुंचे वर्णन –
1) 1,75,000/- रु. किं. चे 35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण जु.वा. किं.अं.
2) 25,000/- रुपये किंमतीचे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याची मंचली जु.वा. किं.अं.
3) 25,000/- रुपये किंमतीचा 5 ग्रॅम वजनाचा सोन्याचा पिळा जु.वा. किं.अं.
4) 25,000/- रुपये किंमतीचा 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जु. वा. किं.अं.
5) 62,500/- रुपये किंमतीचे 12.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले जु. वा. किं.अं.
6) 12,500/- रुपये किंमतीचे 2.50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल जु.वा. किं.अं.
7) 10,000/- रुपये किंमतीचा व्हीवो कंपनीचा मोबाईल सासरे मच्छींद्र बर्डे यांचा त्यामध्ये 9881222729
क्रमांकाचे सिमकार्ड असलेला जु.वा. किं.अं.
क) सासु विमलबाई बर्डे यांचे अंगावरील चोरीला गेलेल्या वस्तुंचे वर्णन –
1) 40,000/- रुपये किंमतीची 08 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र जु.वा. किं.अं.
2) 10,000/- रुपये किंमतीचे 02 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले जु.वा. किं.अं.
एकुण चोरी झालेल्या वस्तुंचे मुल्य – 4,37,200 /- रुपये
वरील वर्णनाचा व किंमतीचे सोन्याचे दागीने व रक्कम, मोबाईल असा मुद्देमाल अनोळखी 05 चोरांनी चाकुचा धाक
दाखवुन बळजबरी चोरुन नेला आहे. त्या अनोळखी चोरांचे वर्णन खालील प्रमाणे
1) माझेकडुन चावी मागणारा चोर इसमाचे वर्णन

अंदाजे 25 ते 30 वर्ष वयाचा 05.50 ते 06 फुट उंचीचा मजबुत बांधा, सावळ्या रंगाचा अंगावर काळ्या रंगाचे
स्वेटर,काळी पॅन्ट,पायात काळ्या पांढरे रंगाचे शुज, भाषा मराठी- हिंदी, डोक्यावर टोपी,
2) माझे पती दौलत बर्डे यांचे हातपाय बांधणारा चोर इसमाचे वर्णन –
अंदाचे 30 ते 35 वर्ष वयाचा अंदाजे 05 फुट उंचीचा सडपातळ बांधा, सावळ्या रंगाचा अंगावर राखाडी रंगाचे
स्वेटर, डोक्यावर टोपी भाषा – हिंदी
3) दरवाजात उभा असलेला चोर इसमाचे वर्णन –
अंदाजे 25 ते 30 वर्ष वयाचा 5 ते 5.5 उंचीचा सडपातळ बांधा, रंग सावळा अंगावर काळ्या रंगाचे स्वेटर भाषा
हिंदी
4) इतर
अंदाजे 20 ते 25 वर्षाचा अंदाजे 5 ते 5.5 फुट इंचीचा मजबुत बांधा, सावळ्या रंगाचा अंगावर काळ्या रंगाचे स्वेटर
भाषा हिंदी मराठी
5) इतर
अंदाजे 30 ते 35 वर्ष वयाचा व अंदाजे 5 ते 5.5 फुट उंचीचा सडपातळ बांधा सावळ्या रंगाचा अंगावर निळ्या
रंगाचे स्वेटर भाषा – मराठी हिंदी
वरील वर्णनाचे अज्ञात चोरांना मी आमचे घरातील लाईटचे उजेडात पाहीले असुन त्यांना पुन्हा बघीतल्यास मी
ओळखु शकते.
तरी दिनांक 09/02/2026 रोजी रात्री 11/00 वा. चे सुमारास घरात आपले परीवारासह झोपलेली असताना
मध्यरात्री दिनांक 10/02/2026 रोजी रात्री 02/00 वा. ते 03/00 वा. चे दरम्यान 5 अनोळखी चोरांनी आमचे
घराचा दरवाजा तोडुन बळजबरी घरात प्रवेश करुन चाकु व बंदुक सदृष्य वस्तुचा धाक दाखवुन पती दौलत यांना
चाकुचे मागील बाजुने डाव्या डोक्याचे वर कपाळावर मारहाण करुन तसेच सासरे मच्छींद्र बर्डे यांना डाव्या
तळहातावर दुखापत करुन घरातुन एकुण 4,35,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने, मोबाईल व रोख रक्कम
चोरुन नेली आहे म्हणुन माझी त्या अनोळखी 5 चोरांविरुध्द तक्रार दाखल केली आहे. भेंडा येथे झालेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून.पोलिस प्रशासनाने लवकरात लवकर तपास करून आरोपींना शिक्षा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यावे स्थानिक गुन्हे अहिल्यानगर, डॉग स्कॉड पथक, शेवगाव चे उपविभागीय पोलीस अधिकारी राजगुरू साहेब, व नेवासा पोलीस यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू केला आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे