गुन्हेगारी
Trending

राहुरी येथे चार अल्पवयीन मुलींच्या अत्याचार प्रकरणात खुनाचा उलगडा.

संतोष औताडे- मुख्य संपादक ,नेवासा दिनांक -23/09/2025

राहुरी पोलिसांकडून अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान खुनाचा उलगडा. आरोपीचा क्रूरतेचा कळस

लैंगिक अत्याचार गुन्ह्यात तसेच खुना च्या गुन्हयातही अजून आरोपी वाढण्याची शक्यता
अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेचे स्वयंसेवक पुजा दहातोंडे यांनी दिनांक 17/09 /2025 रोजी रात्री 9.00 चे सुमारास राहुरी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या माहितीवरून चार अल्पवयीन पीडित मुलींची सुटका करत लैंगिक अत्याचार करणारे दांपत्य
1) बजरंग कारभारी साळुंखे वय 39 वर्ष
2 ) शितल बजरंग साळुंखे वय 40 वर्ष दोघे राहणार दवणगाव तालुका राहुरी
यांना दिनांक 18 09 2025 रोजी अटक करण्यात आली होती.
तर सदर दाखल गुन्ह्यातील आरोपी निलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर वय 32 वर्ष राहणार राहता यास अटक करणे बाकी होते. अटक आरोपीच्या मदतीने पाहिजे आरोपीस अटक करण्याकरिता व इतर तपासा करिता अटक दांपत्यास 19.09.2025 रोजी मान्य न्यायालयापुढे हजर करून त्यांची दिनांक 24 9 2025 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली होती. पोलीस तपासा दरम्यान सदर दांपत्याने अल्पवयीन मुलीं पैकी एका अल्पवयीन मुलीचे(ती 14 वर्षाची असताना) पन्नास वर्षीय व्यक्तीसोबत पाच वर्षा पूर्वी लग्न लावून एक लाख रुपये घेतल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. व नंतर परत तीन महिन्याने तिला आपल्याकडे राहण्यासाठी आणले.
तर दुसऱ्या मुलीचे (16 वर्ष वय) अल्पवयीन असताना लग्न लावून देण्यासाठी तीन लाख रुपये घेतलेले असल्याचे तपासात समजलेले आहे. याबाबत अधिक तपास सुरू असताना
पोलीस कस्टडी रिमांड मध्ये अटक आरोपींकडे पाहिजे आरोपी निलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर वय 32 वर्ष राहणार राहता याच्याबाबत विचारणा केली असता सुरुवातीला त्यांनी उडवा उडवी ची उत्तरे दिली.

*परंतु आज दिनांक 23/09/2025 रोजी अटक आरोपींकडे कसून चौकशी केली असता बजरंग कारभारी साळुंखे वय 39 वर्ष, राहणार दवणगाव याने गुन्ह्यात पाहिजे आरोपी निलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर याच्यासोबत मुलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याच्या कारणाने मार्च 2025 मध्ये एके दिवशी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्याचे राहते घरी गळा दाबून खून करून त्याचा मृतदेह ज्या खोलीत त्याचा खून केला तेथेच रात्री दहापर्यंत ठेवून, रात्री नऊ ते दहा च्या दरम्यान राहते घरामागे खड्डा खोदून मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पत्नीच्या साह्याने पुरून लपवून ठेवल्याचे सांगितल्याने* भारतीय न्याय संहिता कलम 196 अन्वये सदर माहितीची खातर जमा करणे कामी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट श्रीमती संध्या दळवी यांना पाचरण करून दोन पंचा समक्ष अटक आरोपीने दिलेल्या निवेदनाप्रमाणे खात्री केली असता दुपारी 12.00 ते 14 दरम्यान आरोपीने दाखवलेल्या ठिकाणी देवळाली नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने माती उकरून पाहिले असता मृतदेह मिळून आला.

मृत आरोपी निलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर हा राहता येथील राहणारा असून त्याचे आई-वडील मयत झालेले असल्याने तो अटक दांपत्याकडेच राहत होता. त्यामुळे त्याची कुठेही मिसिंग किंवा हरवल्याबाबतची तक्रार देण्यात आलेली नसल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.
तरी मृतदेहाची दवणगाव येथील स्थानिकांच्या मदतीने तो निलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर याचाच असल्याची खात्री करण्यात आली आहे.
सदर मृतदेह फॉरेन्सिक तपासणी कामी प्रायमरी हेल्थ सेंटर चे वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर तहा खान व प्रसाद मासाळ यांच्यामार्फत पोस्टमार्टम करून अंत्यविधी करिता त्याचे नातेवाईक नसल्याने दवणगाव ग्रामपंचायत यांच्या ताब्यात देऊन त्यांच्या मदतीने सरकारी पंचां समक्ष अंत्यविधी करण्यात आलेला आहे. सदर बाबत राहुरी पोलिसांच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री जयदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, पोहेकॉ. सुरज गायकवाड,राहुल यादव, शकूर सय्यद, अशोक शिंदे,पोकॉ. गणेश लिपणे, अंकुश भोसले, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सतीश कुऱ्हाडे, अजिनाथ पाखरे, गोवर्धन कदम. मपोकॉ. मीना नाचन, वंदना पवार, शिवानी गायकवाड, अंजली गुरवे यांनी केली.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे