मा.अपर पोलीस महासंचालक , श्री कृष्ण प्रकाश यांच्याकडून राहुरी पोलीस स्टेशन च्या टीमचा सन्मान.

संतोष औताडे -मुख्य संपादक, नेवासा दिनांक -09/02/2026
मा.अपर पोलीस महासंचालक , श्री कृष्ण प्रकाश साहेब यांच्याकडून राहुरी पोलीस स्टेशन च्या टीमवर्क चे तसेच ऑपरेशन मुस्कान चे कौतुक व शुभेच्छा.
आज दिनांक 09/02/ 2026 रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या इन्स्पेक्शन च्या वेळी , श्री कृष्ण प्रकाश साहेब,अपर पोलीस महासंचालक , फ़ोर्स वन आणि प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई व पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे साहेब राहुरी पोलीस स्टेशन चे ऑपरेशन मुस्कान अंतर्गत १०५ अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन सुटका करत अपहरण करणाऱ्या आरोपींना अटक करत मुदतीत मा न्यायालयात दोषारोप पाठवत कारवाई केल्या बाबत संपूर्ण राहुरी पोलीस स्टेशन चे अधिकारी अंमलदार यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
तसेच पोलीस स्टेशन बेलवंडी येथे कार्यरत असताना बेलवंडी परिसरात वेगवेगळे राज्यातील विविध रेल्वे स्टेशन वरून किडनॅप करून आणलेल्या व वेठबिगारीत बंदिस्त जीवन कंठणाऱ्या गुलामगिरीचे जीवन जगणाऱ्या 23 वेठबिगारांच्या मुक्ततेबाबतही पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे व बेलवंडी पोलीस स्टेशनच्या तत्कालीन टीमचे कौतुक करत प्रशस्ती पत्र दिले .



