गुन्हेगारी
Trending

शेवगांव दरोड्यातील आरोपींची टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन 48 तासात जेरबंद, 1,85,200/- रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त.

संतोष औताडे- मुख्य संपादक,दिनांक:- 11/06/2024
——————————————————–
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 08 जुन 2024 रोजी फिर्यादी श्री. दिपक बाबासाहेब जरांगे रा. मारवाडी गल्ली, ता. शेवगांव हे कुटूंबियासह घरात झोपलेले असतांना अनोळखी 6 इसमांनी फिर्यादीचे घरात प्रवेश करुन चाकुचा धाक दाखवुन व लाथाबुक्यांनी मारहाण करुन घरातील 1,08,000/- रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने चोरुन नेले बाबत तसेच सातपुते गल्ली, ता. शेवगांव येथील श्री. निवृत्ती कारभारी वाणी वय 66, रा. सातपुते गल्ली, ता. शेवगांव यांचे घरात देखील चोरी करुन 1,40,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी नेले बाबत. शेवगांव पो.स्टे. गु.र.नं. 509/2024 भादविक 397, 342 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना वर नमुद गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/समाधान भाटेवाल व अंमलदार दत्तात्रय गव्हाणे, बापुसाहेब फोलाणे, संतोष लोढे, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, संदीप दरंदले, फुरकान शेख, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे व संभाजी कोतकर अशांचे पथक नेमुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना देवुन पथकास रवाना केले होते.
सदर सुचना प्रमाणे दिनांक 10/06/2024 रोजी स्थागुशा पथकाने गुन्हा घडले ठिकाणी जावुन पाहणी केली असता घटना ठिकाणी कोठेही सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने आरोपींची काहीएक माहिती मिळुन येत नव्हती. त्यामुळे पथाक शेवगांव परिसरात फिरुन रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढत असताना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत इसम नामे अनिल ऊर्फ यासीनखॉ शिवाजी भोसले रा. गोंडेगांव, ता. नेवासा याने त्याचे इतर साथीदारांसह गुन्हा केला असुन तो सध्या त्याचे राहते घरी आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी जावुन पहाणी केली असता बातमीतील वर्णना प्रमाणे 2 संशयीत इसम उभे असलेले पथकास दिसले. त्यांना शिताफीने ताब्यात घेवुन पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) अनिल ऊर्फ यासीनखॉ शिवाजी भोसले वय 40 व 2) रोहन अनिल ऊर्फ यासीनखॉ भोसले वय 19, दोन्ही रा. गोंडेगांव, ता. शेवगांव असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता ताब्यातील संशयीतांनी त्यांचे इतर साथीदार नामे अमर दत्तु पवार, कृष्णा ऊर्फ सागर नारायण भोसले, दिपक इंदर भोसले सर्व रा. नेवासा फाटा, ता. नेवासा व सुनिल बाबाखॉ भोसले रा. गोंडेगांव, ता. नेवासा यांचे सोबत मिळुन 2-3 दिवसांपुर्वी शेवगांव परिसरात व 1 महिन्यापुर्वी चांदगांव उस्थळदुमाला, ता. नेवासा परिसरातील मेडीकल दुकान फोडुन रोख रक्कम व पल्सर मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितल्याने आरोपींचे इतर साथीदारांचा शोध घेता आरोपी नामे 3) अमर दत्तु पवार वय 30, 4) कृष्णा ऊर्फ सागर नारायण भोसले वय 21 दोन्ही रा. नेवासा फाटा, ता. नेवासा, 5) सुनिल बाबाखॉ भोसले वय 21, रा. गोंडेगांव, ता. नेवासा हे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेतले. आरोपी नामे 6) दिपक इंदर भोसले रा. नेवासा फाटा, ता. नेवासा (फरार) हा मिळुन आला नाही.
आरोपींनी सांगितल्या प्रमाणे जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे -2 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. शेवगांव 509/24 भादविक 397, 342
2. नेवासा 456/24 भादविक 457, 380, 379

ताब्यात घेतलेल्या आरोपींची अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत 1,85,200/- रुपये किंमतीचे 13 ग्रॅम वजनाचे विविध प्रकारचे दागिने, रोख रक्कम व 1 चाकु असा मुद्देमाल मिळुन आला आल्याने आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेवुन शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं. 509/24 भादविक 397, 342 प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी शेवगांव पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.

आरोपी नामे अनिल ऊर्फ यासीनखॉ शिवाजी भोसले हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यातल दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, आर्म ऍ़क्ट व दुखापत असे गंभीर स्वरुपाचे एकुण 10 गुन्हे दाखल आहेत.

आरोपी नामे अमर दत्तु पवार हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यातल दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, आर्म ऍ़क्ट, दुखापत असे गंभीर स्वरुपाचे एकुण 14 गुन्हे दाखल आहेत.

आरोपी नामे रोहन अनिल ऊर्फ यासीनखॉ भोसले हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यातल दरोड्याचा 1 गंभीर गुन्हा दाखल आहे.

आरोपी नामे सुनिल बाबाखॉ भोसले हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द नेवासा पोलीस स्टेशन येथे चोरीचा 1 गुन्हा दाखल आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. वैभव कलुभर्मे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, मा. श्री. सुनिल पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे