गुन्हेगारी
Trending

राहुरी फॅक्टरी येथील एटीएम च्या बॅटऱ्या चोरणारी टोळी राहुरी पोलिसांनी केली जेरबंद.

संतोष औताडे-मुख्य संपादक,नेवासा.                   दिनांक -24/01/2025

दिनांक 18/01/2025 रोजी पहाटे च्या वेळेला राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी येथील एसबीआय बँकेचे एटीएम मधील एटीएमच्या जवळपास 14 बॅटऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. त्यासंदर्भात राहुरी पोलीस स्टेशन येथे 31/2025 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे यांनी तातडीने तपास पथक नेमले होते. सदर गुन्ह्याचे तपासाच्या अनुषंगाने पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन कदम यांनी तांत्रिक विश्लेषण करून व गोपनीय माहिती घेऊन आरोपी निष्पन्न करून आरोपींना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 नाशिक या पोलीस पथकाच्या मदतीने नाशिक येथून आरोपी 1) प्रवीण मोतीराम अंभोरे राहणार सस्ती तालुका पतुर जिल्हा अकोला 2) भगवान विश्वनाथ सदार राहणार चतारी,तालुका पतुर, जिल्हा अकोला .3)राकेश गया प्रसाद यादव राहणार नांदूर गाव नाशिक अशांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे व चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदर कारवाई मा.राकेश ओला पोलिस अधीक्षक सो,अहमदनगर, मा.वैभव कुलुबर्मे अपर पोलिस अधीक्षक अहमदनगर, मा. बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन,पोहेकों बाबासाहेब शेळके, पोलीस नाईक प्रवीण बागुल, पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन कदम, अमोल भांड व साहेब पोलीस निरीक्षक हिरे, पोलीस अंमलदार चंद्रकांत गवळी, नितीन फुलमाळी, वाल्मीक चव्हाण, जितेंद्र वजीरे, नेमणूक गुन्हे शाखा नाशिक युनिट क्रमांक दोन यांनी केलेली असून पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण बागुल हे करत आहेत.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे