संतोष औताडे– मुख्य संपादक, दिनांक -18/06/2024
हॉटेलवर धाड टाकून तीन महिलांची सुटका
दि. १७/०६/२०२४
प्रस्तुत बातमीतील हकीगत अशी की, श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीतील बनपिंप्री येथील हॉटेल
सुप्रीम येथे वेश्याव्यवसाय चालू असलेबाबत गोपनीय माहिती मिळाली असता सदर माहितीचे अनुषंगाने
पोसई बाळासाहेब शिंदे, पोहेकॉ २०२४ / समीर सय्यद, मपोहेकॉ १२४६ / ए. आर. काळे, मपोकॉ १३६५
छाया रांधवन, चालक पो.कॉ. २६७३ / काळे सर्व नेम. ए. एच. टी. यू. अहमदनगर असे दोन पंचांसह
बातमीतील नमूद ठिकाणी बनपिंप्री येथील हॉटेल सुप्रीम येथे जावून दि. १६/०६/२०२४ रोजी पहाटे
०४.०० वा. अचानक छापा टाकून आरोपी नामे १) किरण रावसाहेब जरे वय ३९ वर्षे रा. वारूळाचा
मारूती रा. नालेगाव, अहमदनगर हा स्वतःचे फायद्याकरिता वेश्या व्यवसायासाठी महिला उपलब्ध
करून देवून कुंटनखाना चालवताना मिळून आलेला आहे. तसेच त्याचेकडून एकूण ४७०० /- रू.
किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर छाप्यामध्ये तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात
आलेली आहे.
.
सदरची कारवाई मा. श्री राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहमदनगर, श्री प्रशांत खैरे, अपर
पोलीस अधिक्षक अहमदनगर, श्री वाखारे उपविभागिय पोलीस अधिकारी कर्जत पो. नि. नंदकुमार दुधाळ
नेम. ए.एच.टी.यू. अहमदनगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पो. नि. श्री. ज्ञानेश्वर भोसले, नेम. श्रीगोंदा
पो.स्टे.. पोसई बाळासाहेब शिंदे, पोहेकॉ / २०२४ समीर सय्यद, मपोहेकॉ १२४६ / अर्चना काळे,
मपोकाँ/१३६५ छाया रांधवन, चालक पो. कॉ. २६७३ / काळे सर्व नेम – अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध
कक्ष (AIITU) अहमदनगर यांनी केली आहे.