महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर मास्टर्स इक्युप्ड पाॅवरलिप्टिंग स्पर्धेत अर्चना काळे यांना रौप्यपदक

संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा दिनांक -11/06/2024
*महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर मास्टर्स इक्युप्ड पाॅवरलिप्टिंग स्पर्धेत अर्चना काळे यांना रौप्यपदक* सविस्तर माहिती- महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर मास्टर्स इक्युप्ड पाॅवरलिप्टिंग स्पर्धेत अर्चना काळे यांना रौप्यपदक पटकावले आहे.दिनांक 31 मे – 2 जुन 2024 या कालावधीत भोईवाडा कामगार मजदुर संघ मुंबई या ठिकाणी या स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत साधारणपणे 100 ते 200 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या पावर लिप्टिंग स्पर्धेत अहमदनगर जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस हवालदार अर्चना काळे यांनी 57 किलो वजन गटात उल्लेखनीय कामगिरी करत दुतीय क्रमांक पटकावून रौप्यपदक मिळविले तसेच पोलिस हवालदार अरविंद भिंगार दिवे यांनी ही उत्कृष्ट कामगिरी केली. या दोन्ही खेळाडूंच्या यशाबद्दल मा.राकेश ओला साहेब पोलिस अधीक्षक अहमदनगर यांनी कौतुक केले आहे. तसेच दोन्ही खेळाडूंना नेस्ट लेव्हल फिटनेस जिमचे संचालक ओंकार गुऀरम, विजय कनेडीया,श्री उमेश इंगावले, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या उत्कृष्ट कामगिरी बद्दल दोन्ही खेळाडूंचे परिसरात तु अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.