आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आरक्षण मिळाल्यानंतर भेंड्यात पुन्हा येईल – मनोज जरांगे पाटील “
संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा, दिनांक- 24/11/2023.
सविस्तर वाचा- नेवासा तालुक्यातील भेंडा येथे श्री संत नागेबाबा यांच्या पावन भुमीत मराठा संघर्ष योध्दा मा. मनोज जरांगे पाटील यांची सभा गुरूवारी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वा. आयोजित करण्यात आली होती . फटाक्यांची आतषबाजी व JCB मधुन फुलांची उधळण करीत मनोज जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा बांधवांनी एकजूट ठेवा . मराठ्यांना आरक्षण मिळणारच आहे. आरक्षण मिळाल्यानंतर भेंड्याला परत भेट देईल असे आश्वासन जरांगे यांनी भेंडा येथील जाहिर सभेत दिले.सकल मराठा समाजाच्या वतीने रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यावर फटाक्यांची आतषबाजी व ११ जेसीबी मधून फुलांची उधळण करीत त्यांचे स्वागत करण्यात आले. मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे 24 डिसेंबर पर्यंत सर्वांनी शांतता राखावी. सत्तर वर्षांपूर्वी आरक्षण मिळाले असते तर आपली मुले आज मोठ्या पदावर गेले असते. आजपर्यंत मराठा समाजातून जे मोठे झाले. त्यांनी गरीब मराठा समाजाच्या मुंडक्यावर पाय ठेवला. आपण सर्व गरीब मराठा आहोत. येथे चेंगराचेंगरी करू नका. नाहीतर मराठ्यांनीच मराठे चेंगरले असे होईल.तुम्हाला आरक्षण समजले नाही. ज्यांना समजले ते एका रात्रीत आरक्षणात गेले. आता गाफील राहू नका. सावध व्हा हाती आलेल्या संधीचे सोने करा. आरक्षण मिळवून घ्या. १ डिसेंबर पासून गावागावात साखळी उपोषण सुरू करा असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.. यावेळी छगन भुजबळ यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. एक मराठा लाख मराठा,कोण म्हणतं देत नाही घेतल्या शिवाय राहत नाही, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत परिसर दणाणून गेला होता.
रस्त्यावर फुलांची उधळण झाल्यानंतर भेंडा येथील सभेच्या संयोजकांनी वाहतूक थांबवून रस्ता साफ केला. ट्रॉफिक कमी करण्यासाठी मदत केली. सभेला भेंडा, सौंदाळा, कुकाणा,देवगाव, नजिक चिंचोली,गोंडेगांव,तरवडी, रांजणगाव, कारेगाव, तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.