सविस्तर माहिती– नेवासा तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीसाठी भेंडा बु येथील उद्योजक बाळासाहेब वाघडकर यांचे नाव सध्या चर्चेत आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नेवासा तालुक्यातील राजकीय वातावरण तापु लागले आहे. आगामी निवडणुकीत तालुक्यातुन कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.नेवासा तालुका हा गडाख व घुले यांचा बालेकिल्ला समजला जातो. या दोन्ही घराण्याच्या आशिर्वादाने अनेकांनी आपली राजकीय कारकीर्द गाजवली आहे. यातच माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या भुमीका निर्णायक ठरणार आहे
अशातच येणाऱ्या आगामी 2025 निवडणुकीसाठी भेंडा बु येथील हॉटेल व्यावसायिक व उद्योजक बाळासाहेब वाघडकर यांचे नाव चर्चेत आहे एक यशस्वी उद्योजक व प्रखर ओबासी चेहरा म्हणून त्यांच्या कडे पाहिले जाते. नेहमीच गावातील राजकारणात व सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असणारे बाळासाहेब वाघडकर यांनी सांगितले की पक्षश्रेष्ठींनी सांगितले तर आगामी निवडणुकीत आपण भेंडा गणातून इच्छुक आहे असे वाघडकर यांनी सांगितले. नेहमीच प्रखर विरोध व भाषाशैली सर्वसामान्य जनतेला मदत करणारा ओबीसी चेहरा म्हणून बाळासाहेब वाघडकर यांचे नाव सध्या खुप चर्चेचा विषय ठरला आहे. बाळासाहेब वाघडकर हे एक उत्तम हॉटेल व्यवसायिक आहे.दोन शाखा असलेल्या हॉटेल अमित चे मालक आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या व्यवसायात यशस्वी भरारी घेतली आहे. नेवासा तालुक्यातील राजकीय क्षेत्रात देखील मोलाचे योगदान आहे.आशातच . यांनी आगामी निवडणुकीसाठी तयार चालू केली आहे भेटी गाठी. गटातून मेळावे व परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भेंडा बु येथील उद्योग व राजकीय क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. भेंडा बु ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले बाळासाहेब वाघडकर यांना त्यांच्या समाजातील वाढता पाठींबा मिळत आहे. अशातच येणाऱ्या आगामी निवडणुकीत आणखी कोण उमेदवार इच्छुक आहे याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. जनतेने संधी दिली तर चांगले काम करून दाखवु असे उद्योजक बाळासाहेब वाघडकर यांनी सांगितले आहे.