श्री विठ्ठल अर्बन को आॅ क्रेडिट सो लि. पतसंस्थेच्या वतीने दिपावली निमित्त कर्मचारी , दैनिक प्रतिनिधी यांना बोनस व मिठाई वाटप.
संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा. दिनांक – 20/10/2025
श्री विठ्ठल अर्बन को आॅ क्रेडिट सो लि. पतसंस्थेच्या वतीने दिपावली निमित्त कर्मचारी व दैनिक प्रतिनिधी यांना बोनस व मिठाई वाटप करण्यात आले.. नेवासा तालुक्यातील भेंडा बु येथील विठ्ठल अर्बन क्रेडिट सो लि संस्थेच्या वतीने आज दिनांक 19 आॅक्टोवर 2025 रोजी संस्थेच्या वतीने दिपावली निमित्त संस्थेचे कर्मचारी यांना बोनस वाटप करण्यात आले त्याचबरोबर संस्थेचे ठेवीदार,कर्जदार, सभासद, कर्मचारी यांना मिठाई वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप सायकड महाराज हे होते.या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित संत महंत यांच्या हस्ते विठ्ठलाची मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल दरवडे यांनी केले. संस्थेच्या कार्याची माहिती व ओळख यावेळी अनेक मान्यवर यांनी करून दिली.
18 मार्च 2018 रोजी अवघ्या 7 सभासद यांनी 5 लाख रुपये भागभांडवल गुंतवणूक करून हि संस्था स्थापन केली होती. परंतु आज या संस्थेने सर्वांचा विस्वास संपादक केला आहे.आज रोजी या संस्थेच्या 5 कोटी रुपयांची उलाढाल असुन 3400 सभासद आहेत. अगदी थोड्या कालावधीत ही संस्था नावारूपाला आली आहे. विठ्ठल अर्बन ही संस्था नेहमी सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असते यावेळी
कु.प्रेरणा सुधीर चक्रणारायन या विद्यार्थ्यांनीने दहावी मधे चांगले मार्क्स मिळवून यश संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच दिपक शिंदे यांची महसूल सेवेत नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला .यावेळी उपस्थित अनेक मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने झाला. सर्व ठेवीदार कर्जदार व सभासद कर्मचारी यांनी संस्थेवर विस्वास ठेवून सहकार्य केले त्याबद्दल आभार मानले.यावेळी
संस्थेचे चेअरमन कृष्णा
गव्हाणे, हभप साहेबराव महाराज गव्हाणे, हभप अंकुश महाराज कादे, शैलेश ससाणे साहेब पोलिस उपनिरीक्षक नेवासा, संचालक
संजय गव्हाणे, गरड सर (पत्रकार)
, सुखदेव फुलारी साहेब (पत्रकार)
दत्तु आघाव, संतोष औताडे (पत्रकार)
चंद्रकांत साबळे, मॅनेजर सुरेश दरवडे, हौशीराम नवले, डॉ. मिसाळ, सुधीर चक्रणारायन,संदीप जावळे,
,काकासाहेब कावरे, मिसाळ मॅडम, औताडे मॅडम, निकम मॅडम, साबळे मॅडम, अभिजित दादा पोटे, गणपत गव्हाणे, भुसारी साहेब, खराडे साहेब ,संदीप जावळे, उत्तम देव्हढे, यादव कराळे, सुनीलअप्पा वाबळे, किशोर वायकर, सुनिताताई गव्हाणे, हभप साहेबराव गव्हाणे, काका नवले, सुनील दगडे, तसेच कर्मचारी वर्ग कृष्णा मंडलिक, ज्ञानेश्वर खुळे मेजर, बाळासाहेब तागड, शुभम आढागळे, भोसले मेजर,भगवान फुलारी, महेश गव्हाणे, प्रविण उंडे, तसेच संदीप जावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी संस्थेचे संचालक, ठेवीदार कर्जदार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.