कृषीवार्ता
Trending

भेंडा गावठाण वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा अधिकारी-कर्मचारी यांचे दुर्लक्ष नागरिकांचा आंदोलनाचा इशारा.

संतोष औताडे (मुख्य संपादक) दिनांक-14 /05/ 2022


भेंडा गावठाण वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा
अधिकारी-कर्मचारी यांचे दुर्लक्ष  नागरिकांचा आंदोलनाचा इशारा.


सविस्तर माहिती– तालुक्यातील भेंडा परिसरातील गावठाण वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा झाल्याने सततच्या खंडित वीज पुरवठ्याने व्यापारी व घरगुती वीज ग्राहक त्रस्त झाला आहे.वेळोवेळी तक्रार करून ही वीज पुरवठा सुरळीत करण्याकडे वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने  ग्राहकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नेवासा तालुक्यातील भेंडा वीज उपकेंद्रातून भेंडा बुद्रुक,भेंडा खुर्द,गोंडेगाव सह इतर गावांना स्वतंत्र गावठाण वीज वहिनी मार्फत घरगुती वीज पुरवठा केला जात आहे. तातडीचा बिघाड अथवा वीज उपकेंद्राला होणारा वीज पुरवठा खंडित झालेच्या कारणाशिवाय इतर वेळी अखंडित वीज पुरवठा व्हावा हा स्वतंत्र गावठाण वीज पुरवठा योजनेचा हेतू आहे. मात्र भेंडा वीज उपकेंद्र याला अपवाद असल्याचे दिसून येत आहे.
उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना वाऱ्याची लहानशी झुळूक आली किंवा पावसाचे चार थेंब पडण्याचे कारणही ही गावठाण वीज पुरवठा खंडित करण्यास पुरेसे ठरत आहे.वीज वाहिनी मधील बिघाड झाल्याचे कारण पुढे करून बारा-बारा,चौदा-चौदा तास वीज पुरवठा बंद ठेवला जात आहे.
आधल्या दिवशी संध्याकाळी 5/6 वाजता बिघाडामुळे वीज पुरवठा बंद झाला तर तो दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत बंदच रहातो, त्याचे कारण म्हणजे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष.वीज कंपनीचे अधिकारी-कर्मचारी सदैव नॉट रीचेबल असतात,रीचेलब असले तरी फोन घेत नाहीत,घेतला तरी काम चालू आहे,येईल येईल असे उत्तरे देऊन वेळ मारून नेतात.

भेंडा गावठाणचा वीज पुरवठा खंडीत
वेळी-अवेळी होत असल्याने ग्राहक अक्षरश: त्रासले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा हा खेळखंडोबा सुरू आहे.ऐन धंद्याचे वेळीच वीज गायब होत असल्याने व्यापारी त्रस्त झालेले आहेत.त्यातच सध्या शाळा, कॉलेजेसकडून ऑनलाइन वर्ग सुरू झालेले आहेत. अद्यापही अनेकांचे ‘वर्क फ्रॉम होम’ कायम आहे. अशात सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांमध्ये रोष वाढतच आहे. केवळ देखभाल, दुरूस्ती अभावी हा बिघाड वारंवार होत आहे. हा वारंवार होणारा बिघाड कायम स्वरूपी दूर करावा अन्यथा कोणती ही पूर्वसूचना न देता वीज वितरण कंपनी विरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे