गुन्हेगारी
Trending

पारनेर येथील मोटार सायकलवर येवुन मोबाईल हिसकावणारे दोन आरोपी मुद्देमालासह जेरबंद

संतोष औताडे (मुख्य संपादक)     दिनांक : – १३ /०६ /२०२२


पारनेर येथील मोटार सायकलवर येवुन मोबाईल हिसकावणारे दोन आरोपी मुद्देमालासह जेरबंद.


स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सविस्तर माहिती- कोमल दत्तात्रय जाधव , वय २३ , रा . करदी , ता . पारनेर या दिनांक ३१/०५/२०२२ रोजी मिलन चौक , पारनेर येथे घरी जाण्यासाठी गाडीची वाट पाहत रस्त्यावर उभ्या असतांना स्प्लेंडर मोटार सायकलवर निळ्या व काळ्या रंगाचे शर्ट घातलेले अज्ञात दोन इसम फिर्यादीचे जवळ येवून हातातील १५,००० / – रु . किंमतीचा व्हिवो कंपनीचा मोबाईल फोन बळजबरीने हिसकावून घेवून गेले आहे . सदर घटने बाबत पारनेर पोलीस स्टेशन गु.र.नं. ४० ९ / २०२२ भादविक ३ ९ २ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मा . पोलीस अधीक्षक सो , अहमदनगर यांचे सुचना नुसार श्री . अनिल कटके , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांचे मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोनि / अनिल कटके यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली कि , सदरचा गुन्हा हा अब्दुल खान रा . तपोवन अहमदनगर याने केला असल्याची खात्रिशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपोवन येथे जावुन आरोपीचे ठावठिकाणा बाबत माहिती घेवुन आरोपी नामे अब्दुल खान हा तपोवन येथील छत्रपती नगर येथे राहतो अशी माहिती मिळाल्याने पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीचे घराचे आजुबाजूस सापळा लावुन शिताफीने ताब्यात घेतले . त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव अब्दुल महेंदरदीन खान रा . छत्रपती नगर तपोवन , अहमदनगर असे असल्याचे सांगितले . आरोपीकडे वर नमुद गुन्हयाबाबत चौकशी केली असता सुरुवातीस तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला . त्यास अधिक विश्वासात घेवुन कसुन चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार नामे सुखचेन केसरसिंग रा . छत्रपती नगर , तपोवन याचे सह केल्याची कबुली दिली . नमुद माहितीचे आधारे आरोपीचा साथीदार नामे सुखचेन केसरसिंग यास ताब्यात घेतले . दोन्ही आरोपींना गुन्ह्यातील चोरलेला १५,००० / – रु . कि . चा व्हिवो कंपनीचा मोबाईल काढुन दिल्याने तो जप्त करुन आरोपीस मुद्देमालासह पारनेर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे . पुढील कार्यवाही पारनेर पोलीस स्टेशन करीत आहे . सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . सौरभकुमार अग्रवाल साहेब , अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . अजीत पाटील साहेब , उपविभागीय पोलीस अधीकारी , नगर ग्रामिण विभाग , अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे .

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे