कृषीवार्ता
Trending

विजवाहक खांबाचे भूभाडे शेतकऱ्यांना मिळवुन देणार – अँड काळे.

संतोष औताडे (मुख्य संपादक नेवासा) दिनांक-27/08/2022


विजवाहक खांबाचे भूभाडे शेतकऱ्यांना मिळवुन देणार – अँड काळे.

सन १८८५ पासुन अस्तित्वात असलेल्या कायद्यास अनुसरून नेवासा तालुक्यातील सौंदाळा आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी शेतातील विजेचे रोहित्र, खांब आदि उपकरणांचे भूभाडे मिळावे यासाठी काल दि.२७ रोजी सौंदाळा येथे शेतकरी संघटनेचे राज्य उपअध्यक्ष मा.अँड अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सौंदाळा ग्रामपंचायतीने बैठक घेतली.

बीड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील विजेचे रोहित्र, खांब आदि उपकरणांचे भूभाडे मिळावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. मात्र त्याची कुणीच दखल न घेतल्याने मा.मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे दाद मागितली होती. त्यावर दि.५ ऑगस्ट २०२२ रोजी न्यायमूर्ती अरुण पेडणेकर व न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाने ९० दिवसाच्या आत सुनावणी घेऊन निर्णय देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. शेतकऱ्यांच्या बाजूने पहिला निकाल लागला आहे.
महावितरण कंपनी विजेच्या तारा,पोल,तान, रोहित्र शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय शेतातून नेतात. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीत या गोष्टी आहेत त्यांना त्या क्षेत्राचे भूभाडे देण्याचा कायदा ब्रिटीश राजवटीपासून अस्तित्वात आहे पण त्याची अंमलबजावणी महावितरणकडून होत नाही. काळाच्या ओघात सदर कायद्याचे महावितरण आणि राज्य सरकारला विसर पडल्याचे दिसत आहे. शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अँड.अजित बबनराव काळे यांनी सर्व शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून फॉर्म भरून देण्याचे आवाहन केले आहे.

शेतकरी संघटना व ग्रामपंचायत सौंदाळा यांच्या माध्यमातुन सदर कार्यक्रम आयोजित केला होता

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते कॉ.बाबा आरगडे तर प्रमुख पाहुणे म्हणून अँड.अजित बबनराव काळे होते उपस्थित, व्यासपीठावर शेतकरी नेते हरिभाऊ तुवर, त्रिंबक भदगले, पेहेरे महाराज, उस्थळ दुमाला गावचे सरपंच बाबासाहेब कोतकर, प्रहार पक्षाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अभिजित अशोक पोटे, कॉ.अप्पासाहेब वाबळे, कॉ.भारत आरगडे, मा.आ.चंद्रशेखर घुले याचे स्वीय सहाय्यक श्री.बाळासाहेब आरगडे, जेष्ठ पत्रकार कारभारी गरड आदी मान्यवर उपस्थित होते.
महावितरण कडून होत असलेल्या अन्यायाविरोधात प्रदीर्घ काळापासून वाचा फोडणाऱ्या श्री.संजय ठुबे या शेतकऱ्याचा फॉर्म शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अँड.अजित बबनराव काळे यांच्या हस्ते भरून श्रीगणेशा करण्यात आला. सभेदरम्यान कार्यक्रमाचे आयोजक मा.सरपंच शरदराव आरगडे यांनी महावितरण विरोधात कर आकारणी बाबत दिलेल्या न्यायालयीन लढाईची माहिती दिली त्याचबरोबर, महावितरण कडून सर्वाधिक मालमत्ता कर वसुल करणारी एकमेव ग्रामपंचायत सौंदाळा असून नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील भूभाडे मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. उपस्थित नागरिकांमध्ये ग्रामपंचायत सदस्य कानिफनाथ आरगडे, सचिन आरगडे, बाळासाहेब बोधक,रामकिसन चामुटे,मिनिनाथ आरगडे, अँड. किशोर चामुटे, अँड.पांडुरंग औताडे, अँड.भागचंद चामुटे, अँड. किशोर आरगडे, वेनुनाथ माळी, ज्ञानेश्वर वाकचौरे, सुनील आरगडे ,तसेच पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे