गुन्हेगारी
Trending

अकोळनेर व बाबुर्डी घुमट , तालुका नगर हद्दीत शेतवस्तीवर जबरी चोरी करणारा आरोपी जेरबंद

संतोष औताडे ( मुख्य संपादक )   दिनांक : १७ /०६ /२०२२


अकोळनेर व बाबुर्डी घुमट , तालुका नगर हद्दीत शेतवस्तीवर जबरी चोरी करणारा आरोपी जेरबंद.

 


स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई प्रस्तुत बातमीची हकिगत- फिर्यादी निता अजित पवार वय ३२ , रा . पवार वस्ती , रेल्वेस्टेशन जवळ , अकोळनेर , ता . नगर या घरात झोपलेले असतांना अज्ञात आरोपी यांनी घराचे छताचे जिन्यातुन घरात प्रवेश करुन फिर्यादीचा गळा दाबुन ४३,००० / – रु . किंमतीचे मंगळसुत्र व मोबाईल फोन बळजबरीने चोरून नेला आहे . सदर घटने बाबत नगर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. ३०५ / २०२२ भादविक ३ ९ २ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . सदर घटना घडल्यानंतर मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधिक्षक अहमनगर यांनी नमुद गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले.अनिल कटके , स्थागुशा यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की , इसम नामे सार्थक काळे हा चोरलेले सोन्याचे दागिने सुपा येथे सोनाराकडे मोडण्यासाठी येणार आहे . अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि कटके यांनी सदर इसमाची खात्री करून कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास रवाना केले . स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे बातमीतील नमुद ठिकाणी सुरेगांव ते सुपा रोड येथे जाऊन सापळा लावुन थांबलेले असतांना एक इसम रस्त्याने येतांना दिसला पोलीस पथकाची चाहुल लागताच सदर इसम शेतामध्ये पळुन जावु लागला . पथकाने सदर इसमाचा पाठलाग करून , त्यास शिताफीने पकडुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव १ ) सार्थक सगडया काळे , वय १ ९ , रा . सुरेगांव , ता . श्रीगोंदा असे असल्याचे सांगितले . त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडती मध्ये सोन्याचांदीचे दागिने व मोबाईल फोन मिळुन आल्याने त्या बाबत विचारपुस करता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला . त्यास अधिक विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने सांगीतले की , सदरचे सोने हे त्याने त्याचे साथीदारासह अकोळनेर , ता नगर येथे घराचे छताचे जिन्यातुन घरात प्रवेश करुन तसेच बाबुर्डी घुमट , ता . नगर येथे शेतातील वस्तीवर चोरी केली आहे . अशी हकिगत सांगितल्याने सदर घटने बाबत नगर तालुका पोलीस स्टेशन येथील गुन्हे अभिलेख पडताळणी असता १ ) नगर तालुका पोस्टे गु.र.नं .३०५ / २०२२ भादविक ३ ९ २ , ३४ प्रमाणे व २ ) नगर तालुका पोस्टे गु.र.नं. ५६३ / २०२ ९ भादविक ३ ९ ४ , ३४ प्रमाणे दोन ( ०२ ) गुन्हे दाखल असले बाबत माहिती प्राप्त इ आल्याने आरोपीस २३,५०० / – रु . किंचे सोन्या चांदीचे दागिने व मोबाईल फोन सह ताब्यात घेवुन नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे . आरोपीचा फरार साथीदाराचा शोध घेतला परंतु तो मिळुन आलेला नाही . त्याचा शोध घेत आहोत . पुढील कारवाई नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे . सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . सौरभकुमार अग्रवाल साहेब , अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . अजीत पाटील साहेब , उपविभागीय पोलीस अधीकारी , नगर ग्रामिण विभाग , अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे