भेंडा येथे मोफत लंम्पी लसीकरण मोहीमेला सुरुवात पशुवैद्यकीय डॉक्टर करणार मोफत लसीकरण.
संतोष औताडे ( मुख्य संपादक नेवासा) दिनांक-18/09/2022
भेंडा येथे मोफत लंम्पी लसीकरण मोहीमेला सुरुवात पशुवैद्यकीय डॉक्टर करणार मोफत लसीकरण.
अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस लम्पी स्कीन आजाराचा धोका वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यात जनावरांना लंम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळें पशुपालक चिंतेत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातही या आजाराच्या आशा अनेक ठिकाणी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर लम्पी आजाराला रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जनावरांना मोफत लसीकरण आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. नेवासा तालुक्यातील भेंडा येथे लंम्पी या आजारांवर मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. लंम्पी लसीची 100 ml ची बाटली असुन यातुन 100 जनावरांना ही लस दिली जाणार आहे. ही लस जनावरांच्या कातडी मधे 1ml ईतकी गाय,म्हैस,वासरे, यांना ही लस टोचली जाणार आहे. आजारी जनावरांना ही लस दिली जाणार नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी गायकवाड यांनी सांगितले आहे. भेंडा येथील खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरांनी ही मोहीम सुरू केली आहे. यामध्ये कोणतीही प्रकारे शुल्क न घेता मोफत लसीकरण मोहीम राबविणार असल्याचे सांगितले आहे. या रोगाने बाधित होणाऱ्या जनावरांची संख्या वाढत आहे. या आजारात काही गुरांना ताप येतो. दुधाळ जनावरांची क्षमता कमी होते. तर जनावरांच्या अंगावर गाठी तयार होतात. चिलटे, माश्या, गोचीड आणि डासांद्वारे लम्पी रोगाचा फैलाव होतो. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता सजग होणं महत्त्वाचं आहे. गोठ्यातील भिणभिणणाऱ्या माशांचा बंदोबस्त करावा. भेंडा व परिसरात कोणत्याही शेतकरी यांच्या जनावरांना लसीकरण करावयाचे असल्यास त्यांनी ग्रामपंचायत किंवा संबंधित पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी कुकाणा डॉ.अमोल गायकवाड यांनी केले आहे. लसीकरणासाठी लागाणा-या लस व इंजेक्शन व इतर साहित्य यांचे वाटप भेंडा येथे करण्यात आले. या वेळी डॉ.शिवाजी शिंदे,तुकाराम मिसाळ ,डॉ.दिलीप यादव, डॉ.ईश्वर उगले, डॉ.नंदु रोडगे, डॉ.अविनाश वाघुले, डॉ.उमेश गोंडे, डॉ.अजय पाठक, रामेश्वर गव्हाणे, संतोष औताडे (पञकार), रामचंद्र गंगावणे, देविदास गव्हाणे, तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भेंडा व परिसरातील लंम्पी आजारांवरील लसीकरण मोहीम लवकर पूर्ण करण्यात येईल शेेतक-यांनी न घाबरता सहकार्य करावे असे आवाहन खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टर यांनी केले आहे.