नेवासा फाटा येथे मुमक्का सुदर्शन पोलिस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या उपस्थितीत शांतता कमीटीची बैठक संपन्न
संतोष औताडे -मुख्य संपादक- नेवासा दिनांक-07/09/2026 नेवासा फाटा येथे मुमक्का सुदर्शन पोलिस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या उपस्थितीत शांतता कमीटीची बैठक संपन्न ..
सविस्तर माहीती- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने नेवासा येथे शांतता समितीची बैठकीचे आयोजन आज दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी लश्मी मंगल कार्यालय नेवासा फाटा येथे आयोजित करण्यात आली होती. अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नेवासा येथे शांतता समितीची बैठक घेतली आहे. या बैठकीत त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सण शांततेत साजरा करण्यासाठी विविध मार्गदर्शक सूचना दिल्या.

या बैठकीतील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:कडक इशारा: पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी नेवासा परिसरातील अतिक्रमण आणि वीज चोरी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट आणि कडक इशारा दिला आहे. सर्व उत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले आहे.: आगामी गणेशोत्सव काळात सर्व मंडळांनी आणि नागरिकांनी नियमांचे पालन करावे, सामाजिक सलोखा राखावा आणि उत्सव गुन्हेमुक्त वातावरणात साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कायदा आणि सुव्यवस्था: सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या बैठकीला नेवासा परिसरातील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक आणि पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशोत्सव हा आपल्या सर्वांचा लाडका, श्रद्धेचा आणि उत्साहाचा सण आहे. हा उत्सव शिस्तीत, आनंदात, पर्यावरणपूरक पद्धतीने आणि सामाजिक सलोखा जपत साजरा व्हावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन साहेब केले. त्याला प्रतिसाद देत यंदाचा गणेशोत्सव प्रशासनाने घालून दिलेल्या नियम, निर्बंध व नियमावलीचे काटेकोर पालन करून साजरा करू, असा शब्द मंडळांनी प्रशासनाला दिला.कर्णकर्कश डिजेचा (DJ) वापर टाळून पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशा आणि लेझीम पथकांना प्राधान्य द्यावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असेही जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सांगितले. कर्णकर्कश डिजेचा (DJ) वापर टाळून पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशा आणि लेझीम पथकांना प्राधान्य द्यावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. या शांतता समितीची बैठक प्रसंगी अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, सोमनाथ वाघचौरे साहेब अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, निरज राजगुरू DYSP शेवगाव, तहसीलदार संजय बिराजदार, नगराध्यक्ष डॉ करण घुले, सर्व पञकार, पोलिस पाटील संघटना, तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर संजय सुखधान यांनी उपस्थितांचे आभार मानले.



