ब्रेकिंग
Trending

अहिल्यानगर जिल्हा वाहतूक शाखेची मोठी कारवाई: डीएसपी चौकात काळ्या काचा असणाऱ्या ५६ गाड्यांवर कारवाई, एकूण १५२ गुन्हे दाखल

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा,            दिनांक- 14/08/2026.          अहिल्यानगर जिल्हा वाहतूक शाखेची मोठी कारवाई: डीएसपी चौकात काळ्या काचा असणाऱ्या ५६ गाड्यांवर कारवाई, एकूण १५२ गुन्हे दाखल

सविस्तर माहिती- दिनांक १३/ ८ /२०२६ रोजी दुपारी १२ ते १४ वाजताचे दरम्यान पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार जिल्हा वाहतूक शाखेने शहरात विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. डीएसपी (DSP) चौकात लावण्यात आलेल्या विशेष नाकाबंदीदरम्यान, केंद्रीय मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल १५२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये बेकायदेशीरपणे काळ्या काचा (ब्लॅक फिल्म) लावून फिरणाऱ्या ५६ फोर व्हीलर गाड्यांचा समावेश आहे

कारवाईचा मुख्य तपशील:-एकूण कारवाया: केंद्रीय मोटार वाहन कायद्यांतर्गत १५२ कारवाया.

काळ्या काचांवर कारवाई: ५६ चारचाकी वाहनांच्या काळ्या फिल्म जागीच काढून दंडात्मक कारवाई करण्यात आली.

प्रमुख ठिकाण: डीएसपी चौक आणि शहरातील इतर विविध चौक.

यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई:-ही धडक मोहीम माननीय पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या राबवली.

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांची ही विशेष मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे