
संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा, दिनांक -04/07/2026. अपर पोलीस अधीक्षक, कार्यालय श्रीरामपुर येथे आरोपींची ओळख परेड, प्रतिबंधक
कारवाई विशेष मोहिम तसेच समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन.
मा. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे आदेशान्वये अहिल्यानगर पोलीस
दलाच्या वतीने जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालणे तसेच
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये सकारात्मक बदल घडवुन आणणे या उददेशाने अपर पोलीस अधीक्षक,
श्रीरामपुर अधिनस्त (उत्तर अहिल्यानगर) १७ पोलीस स्टेशन मधील आरोपींची दिनांक ०४/०७/२०२६ रोजी
ओळख परेड व प्रतिबंधक कारवाई विशेष मोहिम व समुपदेशन कार्याशाळेचे आयोजन अपर पोलीस अधीक्षक,
कार्यालय श्रीरामपुर येथे करण्यात आलेले होते.
सदर मोहिमे अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला दाखल खुन, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी,
चोरी तसेच शरिराविरुध्दचे, आर्म अॅक्ट गुन्हयातील खालीलप्रमाणे आरोपीं हजर होते..
पोलीस स्टेशन आरोपी संख्या
1-श्रीरामपुर शहर पो.स्टे.-35
2-श्रीरामपुर तालुका पो.स्टे.6
3-राहुरी-4
4-कोपरगाव शहर पो.स्टे.-17
5-कोपरगाव तालुका पो.स्टे.-1
6-शिर्डी पो.स्टे.-9
7-राहाता पो.स्टे.-10
8-लोणी पो.स्टे.+5
9-संगमनेर शहर पो.स्टे.-11
10-राजु पो.स्टे.-6
11-आश्वी पो.स्टे.-5. 12- अकोला पो.स्टे-4
13-नेवासा-4
14-सोनई पो.स्टे-4.
एकुण-121
सदर मोहिमे अंतर्गत विविध गुन्हेगारांचे इंट्रॉगेशन फॉर्म प्रथमत: भरुन घेण्यात आले. त्यात
त्यांचे कुटुंबिय, कामाचे ठिकाण, सध्या काय काम करतात ? वापरते वाहन कोणते ? मोबाईल नंबर कोणता?
आदि विविध बाबींची माहिती नोंदवण्यात आली आहे.त्यांनतर या सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडुन भारतीय नागरिक संहिता कलम १२९ अन्वये
कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर यांचे पुढे प्रत्येकी २ लाख रुपयांचे बंधपत्र
करुन घेण्यात आले. या बंधपत्रानुसार यापुढील २ वर्षाचे कालावधीत जर या आरोपींनी पुन्हा कोणताही गुन्हा
केल्यास त्यांचेकडुन २ लाख रुपये वसुल करण्यात येतील व ते शासन जमा करण्यात येतील. बंधपत्राची
रक्कम न भरल्यास त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येईल याबाबतची समज सर्व आरोपींना देण्यात
आली.
• या मोहिमे दरम्यान या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना खालीलप्रमाणे समज देण्यात आली.
१) पुन्हा नव्याने गुन्हा केल्यास पुर्वीचे गुन्हयातील जामिन देखील रदद करण्यात येईल.
२) बंधपत्राची रक्कम २ लाख रुपये शासन जमा करावे लागतील.
३) नवीन गुन्हा केल्यास तडीपार, मोक्का सारखी गंभीर कारवाई करण्यात येईल.
• शिवाय खालील अन्य बाबींची समज दिली.
१) कोणीही कोणत्याही सोशल मिडियावर भाईगिरी करणारे व्हिडिओ शेअर करणार नाही.
२) अन्य कोणत्याही गुन्हेगाराबाबत माहिती असल्यास गोपनिय माहिती पोलीस स्टेशनला दयावी.
३) कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर यांचे पुढे पुढील ६ महीने दर
मंगळवारी सकाळी ११.०० वा. हजर रहावे.
गुन्हेगारीला आळा घालण्याचे उददेशाने आज रोजी वरील प्रमाणे आरोपी हजेरीची व बंधपत्राची
विशेष मोहिम राबविण्यात आली.
सदरची कारवाई ही मा. श्री. मुम्मका सुदर्शन, (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,
श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, श्री. जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस
अधिकारी, श्रीरामपुर, श्री. कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर, श्री. अमोल भारती,
उपिवभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी, श्री. निरज राजगुरु, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव यांचे
मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी उत्तर अहिल्यानगर यांनी केली.



