छञपती संभाजीनगर मध्ये खुन करुन पळालेले आरोपी नेवासा पोलीसांनी केले जेरबंद.

संतोष औताडे- मुख्य संपादक/नेवासा, दिनांक-01/06/2026 —————————– ————————-छञपती संभाजीनगर मध्ये खुन करुन पळालेले आरोपी नेवासा
पोलीसांनी केले जेरबंद.
प्रस्तुत बातमीतील हकीगत अशी की सिडको पोलीस स्टेशन जिल्हा छञपती
संभाजीनगर गु.र.नं. ३५५ / २०२६ भा. न्याय संहिता कलम १०३ (१) प्रमाणे दिनांक ३०/०५/२०२६
रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपींनी छञपती संभाजीनगर मध्ये
एका व्यक्तीची हत्या करुन ते घटनास्थळावरुन पसार झाले होते. सदर आरोपीपैकी दोन मुख्य
आरोपी हे नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत आल्याची गोपनीय माहिती नेवासा पोलीसांना मिळाली.
त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक सागर ढिकले सो. यांनी पोलीस पथक तयार करुन आरोपी शोध
कामी रवाना केले. सदर पथकातील पो.उपनिरीक्षक विकास पाटील, पोका /संतोष शिंदे,
पोकॉ/नारायण डमाळे, पोकॉ/अतुल शेळके, पोकॉ/भारत बोडखे, मपोकॉ/वर्षा कांबळे यांनी
नमुद गुन्ह्यातील आरोपी नामे १) प्रसन्नजित प्रमोद हिवाळे वय २० वर्ष, रा. मुकुंदवाडी सिडको
एन-२ छञपती संभाजीनगर, २) अरुण पदमसिंग भुल वय १९ वर्ष, रा.एन – ७ ओम प्राथमिक
शाळा, छञपती संभाजीनगर यांना ताब्यात घेवुन नेवासा पोलीस स्टेशन येथे आणले व सदर
ताब्यात घेतलेल्या आरोपींताना सिडको पोलीस स्टेशन जिल्हा छञपती संभाजीनगर यांच्या
ताब्यात देण्यात आहे. पुढील तपास सिडको पोलीस स्टेशन जिल्हा छञपती संभाजीनगर हे करीत
आहेत.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. एम. सुदर्शन साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक
श्री. सोमनाथ वाकचौरे साहेब, श्री. वैभव कलुबर्मे साहेब व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी
श्री. निरज राजगुरु साहेब शेवगाव उपविभाग, शेवगाव यांनी दिलेल्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे
नेवासा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सागर ढिकले, पो.उपनिरीक्षक विकास पाटील,
पोकॉ/संतोष शिंदे, पोकों/नारायण डमाळे, पोकॉ/अतुल शेळके, पोकॉ/ भारत बोडखे, मपोकों / वर्षा
कांबळे यांनी केली आहे.



