अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांना कार्यकारी दंडाधिकारी घोषित केल्यानंतर चॅप्टर केसेस मधील १६ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी.
संतोष औताडे – मुख्य संपादक, नेवासा दिनांक -14/11/2025
अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांना कार्यकारी दंडाधिकारी घोषित केल्यानंतर चॅप्टर केसेस मधील १६ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी. सविस्तर माहिती-
महाराष्ट्र शासन अधिसुचना क्रं. पीआरओ- ०६२४ / प्र.क्र. ३१/ विशा- २ दिनांक २८/०६/२०२४
नुसार अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर यांना कार्यकारी दंडाधिकारी म्हणुन घोषीत
करण्यात आले आहे. त्यानुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १२६, १२७, १२८,१२९ खालील चॅप्टर
केसेस त्यातील बंधपत्रे, बंधपत्राचे उल्लंघन, जामीनदार घेणे, स्वीकारणे, नाकारणे ई. कामकाज त्यांचे पुढे
चालतात. त्याअनुषंगाने चांगल्या वर्तवणुकसाठी बंधपत्र घेणे, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांकडून
समाजविघातक व्यक्ती कडुन बंधपत्र घेणे असे कामकाज कार्यकारी दंडाधिकारी म्हणुन त्यांचे समक्ष चालते.
तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता १६३ खालील प्रवेशबंदी प्रस्तावांवर देखील कार्यकारी दंडाधिकारी
यांचे पुढे कामकाज होते.
हददीतील विविध पोलीस स्टेशन कडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे भारतीय नागरिक सुरक्षा
संहिता कलम १२९ खाली चांगल्या वर्तणुकीसाठी चे प्रस्ताव अर्थात चॅप्टर केसेस कार्यकारी दंडाधिकारी तथा
अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर यांचे पुढे पाठविण्यात आले होते. कार्यकारी दंडाधिकारी
तथा अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर यांनी सदर प्रकरणी सुनावणी घेवुन सुनावणी
अंती १६ गैरअर्जदार / प्रतिवादी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्यांची पोलीस स्टेशन निहाय माहितीनुसार
पोलीस स्टेशन श्रीरामपुर,संगमनेर शहर,
कोपरगाव शहर,राहुरी. तसेच एकुण
न्यायालयीन कोठडीत पाठवलेल्या गैरअर्जदार
प्रतिवादी यांची संख्या
यापैकी काही गैरअर्जदार / प्रतिवादी यांनी बंधपत्र करुन देण्यासाठी जामीनदार हजर केले नाही तर
काही गैरअर्जदार/प्रतिवादी यांनी बंधपत्र केल्यानंतर पुन्हा बंधपत्राचे उल्लंघन करुन पुन्हा नव्याने गुन्हे केले
आहेत.
जेव्हा एखादा व्यक्ती दोन वर्ष, तीन वर्षांसाठी कार्यकारी दंडाधिकारी यांचेपुढे बंधपत्र करुन
देतो, तेव्हा त्याने बंधपत्राच्या कालावधीत पुन्हा कोणताही गैरप्रकार व गुन्हा करणे अपेक्षित नसते. तसे
केल्यास तो बंधपत्राचा भंग करतो व त्याचेवर बंधपत्र उल्लंघनाची कारवाई सुरु होते. तसेच कार्यकारी
दंडाधिकारी यांचेपुढे जर योग्य व सक्षम जामीनदार हजर करण्यास कसुर केल्यास त्यांचीही कार्यकारी
दंडाधिकारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करतात. त्याअनुषंगाने या १६ व्यक्तींची न्यायालयीन कोठडीत
रवानगी करण्यात आलेली आहे.
आगामी निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर ५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांवर
चॅप्टर केसेस कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर यांचे पुढे
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १२९ अन्वये सादर करणेबाबत मा. श्री. सोमनाथ घार्गे साो, पोलीस
अधीक्षक, अहिल्यानगर यांनी आदेश दिलेले होते.
त्याअनुषंगाने श्री. जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर, श्री. कुणाल
सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर, श्री. अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी,
शिर्डी यांनी आपआपले विभागातील अधिनस्त पोलीस स्टेशनला ५ पेक्षा जास्त दाखल असलेल्या
गुन्हेगारांचे पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी श्रीरामपुर शहर, संगमनेर शहर, राहुरी, कोपरगाव शहर,
लोणी पोलीस स्टेशन यांचे मार्फतीने वेगवेगळे प्रस्ताव सादर करुन त्यापैकी नमुद १६ गैरअर्जदार /
प्रतिवादी यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेले आहे.कार्यकारी दंडाधिकारी म्हणून मिळालेल्या अधिकारांचा गुन्हेगारांविरुद्ध अतिशय प्रभावी वापर आपण पहिल्यांदा केला आहे…
नवीन कायद्यानुसार अपर पोलीस अधीक्षक यांना कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित केले आहे. त्या अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याची राज्यातील एवढी मोठी पहिलीच कारवाई केली आहे असे सोमनाथ वाघचौरे अप्पर लीस अधीक्षक श्रीरामपूर यांनी सांगितले आहे.



