क्रिडा व मनोरंजन
Trending

नेवासा पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी घेतली कुकाणा येथील याञा कमिटीची बैठक .

संतोष औताडे -मुख्य संपादक नेवासा,                 दिनांक- 02/12/2024


सविस्तर माहिती-  नेवासा पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी घेतली कुकाणा येथील याञा कमीटीची बैठक . कुकाना स्थित हजरत सय्यद न्यामत बाबा दर्गा उत्सव संबंधाने आज मंगळवारी 3 डिसेंबर रोजी धनंजय अ. जाधव पोलीस निरीक्षक नेवासा यांनी यात्रा कमिटीची दर्गा परिसरामध्ये बैठक घेतली.

Oplus_0

या बैठकीमध्ये अब्दुल हफिस शेख, अमोल अभंग, वसंतराव देशमुख, भाऊसाहेब कोलते, कारभारी गोरडे, विलास देशमुख, इस्माईल शेख, राम जाधव, दौलत देशमुख, बालमभाई शेख, बाळासाहेब कापरे, एकनाथ कापरे, इनुस बालंदर, अरुण कुमार देशमुख, मुसाभाई इनामदार, इकबाल इनामदार, शकूर शेख, रामदास गोल्हार ईत्यादी उपस्थित होते.

बैठकीमध्ये स्थानिक नागरिकांनी मागील अनुभवावरून तक्रारी वजा सूचना मांडल्या. यामध्ये तरवडी चौकात पोलीस राऊटी उभारणे, दर्ग्याच्या पाठीमागे पोलीस पिंजरा उभा करणे, साधे वेषात पोलीस नेमणे, डीजे डॉल्बीला परवानगी देऊ नये. तमाशा कार्यक्रमासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, मोटर सायकलचे सायलेन्सर काढून मोटर सायकल पळवतात, हगामा बंदोबस्त इत्यादी सूचना मांडल्या.
स्थानिक यात्रा कमिटी व नागरिकांनी मांडलेल्या सर्व सूचनेवर तातडीने कारवाई कार्यवाही कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
उत्सव काळामध्ये कोणीही डॉल्बी लावून चादर मिरवणूक काढणार नाही तसेच मोटर सायकलचे सायलेन्सर काढून कोणीही वाहने पळवणार नाहीत. या बाबतच्या सक्त सूचना पोलिसांना दिल्या असून सक्त कारवाई करण्यात येणार असल्याचे सुतोवाच पोलीस निरीक्षक जाधव यांनी केले आहे. तसेच छेडछाड, रोमिओगिरी, टिंगल-टवाळी करणाऱ्या मुलांवर कठोर कारवाई करणारे सध्या वेषातील पथक देखील कार्यरत राहणार असल्याचे सांगितले आहे.                                              
बैठकीच्या वेळी कुकाणा दूरक्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे, पोलीस नाईक काळोखे, गांगुर्डे, पोलीस कॉन्स्टेबल अवी वैद्य, रसाळ, फाटक, महिसमाळे इत्यादी हजर होते.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे