संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा दिनांक -09/10/2025
इंस्टाग्राम वर आक्षेपार्ह पोस्ट / व्हिडिओ टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल*
शनिवार दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी श्रीरामपूर येथून दोन तरुण परिसरामध्ये गेले होते तेथे त्यांनी एक व्हिडिओ तयार करून तो व्हिडिओ इंस्टाग्राम वर अपलोड केला होता.
व्हिडिओमध्ये हे दोन्ही तरुण श्रीरामपूर वरून लोणी येथे कॉलेजला आलेला मुलींची टिंगल टवाळी करण्यासाठी आल्याबाबत परस्परांशी बोलत असल्याचे दिसून येत आहे.
त्यांचा उद्देश हा दुसरा तिसरा कोणताही नसून केवळ मुलींची छेड काढणे हा असल्याचे इंस्टाग्राम वरील व्हिडिओ वरून दिसून आल्यावर पोलिसांनी या दोघेही तरुणांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस केले असता त्यांची नावे खालील प्रमाणे असल्याचे निष्पन्न झाले
1) शाहिद हुसेन शेख, वय 21 वर्षे
2) सात हशम सय्यद, वय 20, वर्ष
या दोघेही आरोपींविरुद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे पोलिसांनी स्वतः फिर्याद दाखल करून गुन्हा रजिस्टर नंबर 548/2025 कलम भारतीय न्याय संहिता 62, 79 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 112,117अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पुढील तपास लोणी पोलीस निरीक्षक वाघ हे करत आहे.
दोघेही आरोपींचे मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. दोघेही आरोपींनी आपल्या बेकायदेशीर वर्तनाची माफी देखील मागितल्या बाबतचा व्हिडिओ प्रसारित केलेला आहे.
पोलीस विभागाकडून सोशल मीडिया अर्थात फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम यावर प्रसारित होणाऱ्या विविध पोस्टवर लक्ष ठेवण्यात येत असून जर कोणी अशा प्रकारे गैरवर्तन करून आपत्तीजनक पोस्ट प्रसारित करत असल्यास त्यांच्यावर पोलीस स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करत आहेत. महिला, मुली यांच्याशी संबंधित गैरप्रकार करणाऱ्यांवर गंभीर कारवाई करण्यात येईल.
शाळा महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलीनी असे कोणाकडूनही गैरप्रकार किंवा गैरवर्तन होत असल्याचे दिसून आल्यास त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनची संपर्क साधावा. जेणेकरून अश्या गैरवर्तन करणाऱ्यांवर गंभीर कारवाई करण्यात येईल…असे आवाहन सोमनाथ वाघचौरे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांनी केले आहे.