बाभुळखेडे गावच्या सरपंच सौ.अश्विनी औताडे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान.

संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा दिनांक-01/11/2025
बाभुळखेडे गावच्या सरपंच सौ.अश्विनी औताडे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार 2025 प्रदान.
सविस्तर माहिती-
नेवासा तालुक्यातील बाभुळखेडे गावच्या सरपंच सौ.अश्विनी ज्ञानेश्वर पा.औताडे यांना ग्रामविकासातील उल्लेखनिय कार्याबद्दल सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांचे वतीने दिला जाणारा २०२५ चा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
माऊली संकुल सभागृह, अहिल्यानगर येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात प्रमुख मान्यवराच्यां उपस्थितीत सौ.अश्विनी औताडे यांना सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सरपंच सौ.अश्विनी औताडे यांना या अगोदर कोरोना काळातील उल्लेखनिय कार्याबद्दल राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्कार,दोन वेळेस राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार असे तिन पुरस्कार मिळालेले आहे.
सरपंच सौ.अश्विनी औताडे यांनी आपले पती उद्योजक ज्ञानेश्वर पा. औताडे यांच्या मदतीने बाभुळखेडा गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन विविध योजना राबवल्या. मा.आ.शंकररावजी गडाख पा. यांच्या माध्यमातुन गावात भव्यदिव्य नविन सभामडंप, नविन स्मशानभुमी,व्यायामशाळा आदी विकासकामे मार्गी लावली. तसेच सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना राबवत गावात मोफत सर्वरोग निदान शिबिर, नेञरोग तपासणी शिबिर,रक्तदान शिबिर,यासांरखे आरोग्य शिबीर घेतले.कोरोना सारख्या महाभयंकर काळात आरोग्य विभागाच्या सहकार्याने घरोघरी जाउन प्रत्येकाची कोरोना चाचणी घेऊन गावात अनेकवेळा कोरोना लसीकरणाचे शिबीर घेत गावात १००% लसीकरण करुन घेतले. तसेच गावातील विविध विकासकामासांठी मोठ्या प्रमाणात निधी आणुन ग्रामविकासाचा आलेख चढता ठेवला.याच उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन सौ.अश्विनी औताडे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सदर पुरस्कार लोकाभिमुख योजना राबविण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे व हा पुरस्कार समस्त बाभुळखेडे ग्रामस्थांना समर्पित करीत असल्याचे सरपंच सौ.अश्विनी औताडे यांनी सांगितले.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल मा.मंञी शंकररावजी गडाख पा., खासदार भाऊसाहेबजी वाकचौरे, जिल्हा परीषद अर्थ समितीचे मा.सभापती सुनिलभाऊ गडाख, मा.सभापती सौ.सुनिताताई गडाख, उदयनदादा गडाख, मा.सभापती रावसाहेब पा.कांगुणे आदीनीं सरपंच सौ.अश्विनी औताडे यांचे अभिनदंन केले.



